Published On : Mon, Jul 12th, 2021

दिल्लीतील दागिने चोरांची टोळी गजाआड

Advertisement

– चौघांना अटक, १० लाखांचा माल जप्त
– सराफा आणि रिक्षा चालकांचा समावेश

नागपूर: प्रवाशांच्या दागिन्यांवर हात साफ करणाèया दिल्लीतील टोळीच्या मुसक्या लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या. या टोळीने नागपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात मेल, एक्सप्रेसमधील आरक्षित डब्यात प्रवाशांच्या ट्राली बॅग, पर्स, दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. त्यांच्याकडून पाच गुन्ह्यातील १० लाख १६ हजार रुपये qकमतीचे २७० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली.

रविqसग उर्फ तिल्ली लुभाना (२७), विनोद उर्फ काले सैनी (४२), सोनू गर्ग (२५), पवन वर्मा (५०) सर्व रा. त्रिलोकपुरी, दिल्ली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. धावत्या रेल्वेत प्रवाशांचे दागिने चोरून त्यांनी ते वितळविले. शुद्ध सोन्याची लगड तयार करून ती विकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली.

दिल्लीतील या टोळीतील सदस्य जानेवारी २०२१ मध्ये नागपुरात आले. त्यांनी रेकी करून ११ जानेवारीला नवजीवन एक्सप्रेसमधून दागिने चोरले. २५ मार्च रोजी सेवाग्राम एक्सप्रेस, १४ जूनला पुन्हा नवजीवन एक्सप्रेसमधून ६ बॅग चोरल्या त्यानंतर जोधपूर चेन्नई एक्सप्रेसमध्ये चोरी केली. या टोळीतील पवन वर्मा हा सराफा व्यापारी आहे. चोरलेले दागिने वितळवून तो शुद्ध सोने काढतो. त्याची लगड तयार करून मिर्झापूर, उत्तरप्रदेश येथील नातेवाईक असलेल्या सराफालाच विकतो. सोनू हा रिक्षाचालक असून, विनोद बिछायत केंद्र चालवतो. रवी हा टोळीचा म्होरक्या असला तरी खèया अर्थाने पवनची पत्नी टोळी चालवते. सध्या ती फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

कोरोनाच्या दुसèया लाटेदरम्यान नागपूर लोहमार्ग पोलिस जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली. सततच्या चोरीने पोलिस त्रस्त होते. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. कौशल्याचा वापर करीत चंद्रपुरातील लॉजची तपासणी केली असता संशयिताचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळाला. त्यावरून त्याचा पत्ता शोधला आणि दिल्लीत जावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक वैशाली qशदे, उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश qशदे यांच्या मार्गदर्शनात आणि पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या नेतृत्वात पथकाने केली.