Published On : Mon, Feb 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचीकारवाई; ५०५ किलो गांजा जप्त, आंतरराज्यीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश!

Advertisement

नागपूर : शहरात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नागपूर अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या विशेष पथकाने मौदा येथील माथनी टोल प्लाझा परिसरात सापळा रचत एका ट्रकमधून तब्बल ५०५ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून ही मोठी खेप ओडिशातून नागपुरात आणली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सोमवारी सकाळी मौदा परिसरात कारवाई केली. मोबाईल लोकेशन ट्रॅकिंगच्या मदतीने संशयित ट्रकचा मागोवा घेण्यात आला आणि माथनी टोल नाक्यावर तो अडवण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये लपवून ठेवलेला सुमारे ५०५ किलो गांजा आढळून आला.

Gold Rate
Feb 23rd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,59,800 /-
Gold 22 KT ₹ 1,48,600 /-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कारवाईपूर्वी पोलिसांनी झिंगाबाई टाकळी परिसरात छापा टाकून कुख्यात ड्रग तस्कर अब्दुल वहीद उर्फ ‘खोका’ याला अटक केली होती. आरोपी आपल्या सासरच्या घरातूनच गांजा तस्करीचे जाळे चालवत असल्याचे उघड झाले. त्याच्या घरातून सुमारे ७५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता.

चौकशीत आरोपीच्या मोबाईल फोनमधून ओडिशातील एका संशयित क्रमांकाचा सुगावा लागला. तो ट्रक नागपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मौदा टोल नाक्यावर सापळा रचला आणि मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करत आंतरराज्यीय तस्करीचे रॅकेट उघड केले.सध्या अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाची सखोल चौकशी सुरू असून या अमली पदार्थ तस्करीच्या संपूर्ण नेटवर्कचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement