| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jul 15th, 2019

  अनधिकृत धार्मिक स्थळांवर नासुप्र’ची कारवाई

  नागपूर : मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नासुप्र’च्या मा. सभापती व मा. अधीक्षक अभियंता (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवार, दिनांक १५/०७/२०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे पूर्व नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई आली. कारवाई करण्यात आलेल्या धार्मिक स्थळांमध्ये

  १) सार्वजनिक दत्त मंदिर, प्ले ग्राउंड दिघोरीकर चौक, जुना बगडगंज
  २) हनुमान मंदिर, दिघोरीकर मैदान चौक, जुना बगडगंज
  ३) नागोबा मंदिर, स्टेडियम जवळ गरोबा मैदान
  ४) नागोबा मंदिर, गरोबा मैदान
  ५) जयमाता मंदिर, सतनामी नगर’चा समावेश आहे. सदर कारवाई २ जेसीबी व २ टिप्पर’च्या साह्याने करण्यात आली.

  नासुप्र’च्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. संजय चिमुरकर, विभागीय अधिकारी श्री. सिध्दार्थ मानकर, कनिष्ठ अभियंता श्री. दिपक धकाते, क्षतिपथक प्रमुख श्री. मनोहर पाटील तसेच लकडगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. भानुदास पिंदूरकर व इतर पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145