Published On : Mon, Jul 15th, 2019

श्रीसाई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

Advertisement

कन्हान : – साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् महाविद्यालय सालवाच्या उन्हाळी २०१९ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारा घेतलेल्या बी.ए तृतीय वर्षाचा निकाल ६६.६६ % लागला असुन महाविद्यालयातील कु.अश्विनी रमेश भोले ७८.२०% प्रथम, कु.प्रगती नारायण महादूले ७१.६०% व्दितीय, कु.धमन्त्री नरेंद्र महादूले ६७.४०% तृतीय सह कु. पूजा भोले, कु.मेघा राऊत, सोनू सोमकुवर, कु.दिक्षिता चाकोले, कु.पिंकी भोले विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या तर उर्वरित मयूर महादूले, कु. वैशाली चौधरी, अतुल डोंगरे, कु.राधा टंडन, कु.जयश्री कीनेकार, कु.शीतल चौधरी या विद्यार्थ्यानी दितीय श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झाले.

विध्यार्थ्यांना मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल गारुडी, सचिव श्री विजयराव कठाळकर, सहसचिव श्री रामदासजी बारबद्धदे, महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या डॉ.सुप्रिया राजेश पेंढारी हयांनी आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांरी महाविद्याल याचे कार्यकारी प्राध्यापक डॉ.ऋषीकेश गोरे, प्रा.कु.पल्लवी ठाकरे, प्रा.सारिका सूर्यवंशी, प्रा.ढोरे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

तसेच महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी श्री रामेश्वर नागपुरे, श्री नितीन कारेमोरे, श्री पंकज वांढरे यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या यानंतर सुध्दा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारा घेण्यात येणा-या परीक्षांमध्ये ही परंपरा कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल अशी अपेक्षा सर्वानी व्यकत केली.