Published On : Mon, Jul 15th, 2019

‘त्या’अनोळखी तरुणाच्या खून प्रकरणाचे रहस्य अजूनही गुलदस्त्यात


कामठी : स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी शिवारातील मो याकूब चिरामुद्दीन शाह दरगाह जवळील कालव्यालगत अज्ञात आरोपीने एका अनोळखी तरुणाचा दगडाने ठेचुन खून करीत पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने घटनास्थळावरील काही दूर अंतरावरील झुडपी भागातील जुन्या विहिरीत मृतदेह फेकल्याची घटना काल रविवारी सकाळी 8 वाजता निदर्शनास आली असता यासंदर्भात जुनी कामठी पोलिसांनी घटनेची नोंद करीत अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला .मृतदेहाच्या पार्थिवावर आज नागपूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले .आज या घटनेला घडून दिवस लोटून गेला तरी सुद्धा या खून प्रकरणात मृतकाची ओळख तसेच मारेकऱ्यांच शोध लावण्यात जुनी कामठी पोलिसांना अपयश प्राप्त झाल्याने या खून प्रकरणाचे गूढ रहस्य अजूनही कायमच आहे.

प्राप्त माहितीनुसार जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत खैरी शिवारातच अनोळखी मृतदेह आढळण्याची मागील तीन महिन्यातील ही तिसरी घटना आहे.यानुसार 11 मे ला सकाळी 10 वाजता खैरी येथील मानकर नावाच्या शेतात एक मानवी सांगडा निदर्शनास आला होता व मृतदेह कुजलेले होते याप्रसंगी जुनी कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपासाला गती दिली. दरम्यान मृतकाच्या प्यांट मध्ये असलेले कुजलेले आधार कार्ड च्या आधारावर व तर्कशक्तीचा पुरेपूर उपयोग करीत आव्हानात्मक स्थितीत सुद्धा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून या मृत्यू प्रकरणाचे गूढ रहस्य उघडकीस आणण्यात यशप्राप्त केले होते.

ओळख पेटलेल्या या मृतक इसमाचे नाव शेख इस्राईल शेख म्हबूब वय 47 वर्षे रा काटोल रोड नागपूर असे होते तर त्याच दिवशी 13 मे ला रात्री 8 वाजता खैरी गावातीलच एका अभिमन्यू डोरले यांच्या शेतातील बांध्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना घडली होती यावेळी सुद्धा मार्ग दाखल करीत त्वरित एका दिवसातच या मृत्यू प्रकरणाचे रहस्य उघडकीस आणून मृतक महिलेची ओळख पटवून देण्यात यश गाठले होते या मृतक महिलेचे नाव गोदाबाई महाराजदिन यादव वय 70 वर्षे असे होते .

मात्र काल 14 जुलै ला घडलेल्या या नाट्यमय खून प्रकरणाचे रहस्य उलगडंन्यास मदत व्हावी यासाठी डीसीपी हर्ष पोद्दार यानि यामृत्यू प्रकरणातील मृतकाची ओळख पटावी यासाठी शोधपत्रिका प्रसिद्धी सुद्धा करण्यात आली. तरीसुद्धा या प्रकरणात जुनी कामठी पोलिसासमोर एक आव्हाणच उभे होऊन ठाकले आहे.