नागपूर : शहरात तान्हा पोळा, मारबत, बडग्या, गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद यांसारखे सण शांततेत पार पडावेत, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
परिमंडळ क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या वाडी, एमआयडीसी, हिंगणा, प्रतापनगर, बजाजनगर आणि सोनेगाव या सहा पोलीस ठाण्यांमधील एकूण ५१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
शरीरावर व मालमत्तेवर हल्ले करणारे तसेच अवैध दारू विक्रीसारख्या गुन्हेगारी कृत्यात गुंतलेले आरोपी भविष्यात कायद्याचा भंग करू शकतात, अशी शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.
तडीपार झालेल्या आरोपींचे तपशील-
हिंगणा पोलीस ठाणे – ५ आरोपी
वाडी पोलीस ठाणे – १३ आरोपी
एमआयडीसी पोलीस ठाणे – १० आरोपी
प्रतापनगर पोलीस ठाणे – १० आरोपी
बजाजनगर पोलीस ठाणे – ९ आरोपी
सोनेगाव पोलीस ठाणे – ४ आरोपी
याप्रमाणे एकूण ५१ आरोपींना १५ दिवसांसाठी परिमंडळ क्र. १ च्या हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस उपआयुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी, पोलिस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून दिलेल्या अधिकारांचा वापर करून केली.