Published On : Tue, Nov 5th, 2019

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-या १६०७ शैक्षणिक संस्था, दवाखाने, मॉल, उपहारगृहे आदींवर कारवाई

मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रस्ते, फुटपाथ, मोकळ्या जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-या १६०७ शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब, मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल्स, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस, प्रोव्‍हायडर आदींवर कारवाई करण्यात आली. ११ डिसेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१९ दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

उपद्रव शोध पथकाचे स्कॉड लिडर विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करुन शहर विद्रुप करणा-यांवर कारवाई करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून पथकामध्ये ८७ जणांचा समावेश आहे.

Advertisement

उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस आदींमार्फत रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेत कचरा टाकणा-या ७७७ उपद्रवींवर कारवाई करुन ५ लाख ८७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब आदींमार्फत कचरा टाकून रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागांसह सार्वजनिक ठिकाणे विद्रुप करणा-या १२० जणांवर कारवाई करीत १ लाख ९७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल्स, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस, प्रोव्‍हायडर आदींमार्फत रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेत कचरा टाकणा-या ७१० उपद्रवींवर १३ लाख १० हजारांचा दंड थोठावण्यात आला आहे. तिन्ही कारवायांमधून एकूण २० लाख ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपद्रव शोध पथकाद्वारे देण्यात आली आहे.

मंगळवारी, नेहरूनगर व लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक कारवाई
उपद्रव शोध पथकाद्वारे शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब, मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल्स, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस, प्रोव्‍हायडर आदींच्या सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याबाबत मंगळवारी, नेहरूनगर व लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. रस्ते, फुटपाथ, मोकळ्या जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-या शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेसवर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला आहे. मंगळवारी झोनमध्ये २०७ या शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेसवर कारवाई करण्यात आली आहे.

तर दवाखाने, इस्पितळे व पॅथलॅबवर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये नेहरूनगर झोनमध्ये सर्वाधिक ४८ दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅबकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल्स, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस, प्रोव्‍हायडर आदींवरील कारवाईमध्ये लक्ष्मीनगर झोन अव्वल स्थानावर आहे. लक्ष्मीनगर झोनमधील २०४ कारवायांमधून दंड वसूल करण्यात आला आहे.

उपद्रवींची माहिती मनपाला द्या
नागपूर शहर संपूर्ण देशात सुंदर शहर म्हणून ख्यातीप्राप्त होत आहे. आपले शहर हिरवे, सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याकडून कुठलाही उपद्रव होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी आणि असे काही आढळल्यास त्वरित महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक किंवा स्वच्छता विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे झोननिहाय करण्यात आलेल्या कारवाया

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement