Published On : Tue, Nov 5th, 2019

बोरगाव चौक ते अवस्ती नगर ते सादीकाबाद टी पॉईंट दरम्यान वाहतूक बंद

मनपा आयुक्तांचे आदेश : सीमेंट रस्ता बांधकामामुळे डाव्या बाजुने दुतर्फा वाहतूक

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत बोरगाव चौक ते अवस्ती नगर ते सादीकाबाद टी पॉईंट पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम प्रस्तावित असून सदर कामाकरीता या मार्गावरील डाव्या बाजुकडील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Advertisement

नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ पॅकेज क्रमांक ८ मधील रस्ता क्रमांक ३२ बोरगाव चौक ते अवस्ती नगर ते सादीकाबाद टी पॉईंट दरम्यान सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील डाव्या बाजुकडील वाहतूक १० नोव्हेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत बंद राहणार आहे.

Advertisement

सदर मार्गावरील वाहतूक उजव्या बाजूकडून व वळती रस्त्यांवरून वळविण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. सदरबाबतचे लेखी आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement