अमरावती: पुण्याहून नागपूरला येणाऱ्या एका लक्झरी बस आणि ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील १५ प्रवासी जखमी झाले. अमरावती जिल्ह्यातील धामणगावपासून काही अंतरावर बुधवारी सकाळी हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, बस चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच काळात हा भयानक अपघात घडला. बस वेगाने जात होती, त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट ट्रकला धडकली. या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, बस चालकाचा जागीच मृत्यू झाला.
ट्रकला धडक दिल्यानंतर बस समृद्धी महामार्गाचे रेलिंग तोडून खाली पडली यावरून अपघात किती भीषण असेल याचा अंदाज येऊ शकते. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने मदतीसह बचाव कार्य सुरू करण्यात आले.
जखमींना प्राथमिक उपचारांसाठी रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.तसेच पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.
दरम्यान या अपघाताने पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेचे महत्त्व आणि वेगाने गाडी चालवण्याचे धोके अधोरेखित केले आहेत.