Published On : Thu, May 6th, 2021

नेरी नदीपात्रात तरुणाचा बुडाल्याने मृत्यू

कामठी :-स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कन्हान नदीच्या नेरी नदीपात्रात एका 15 वर्षीय अल्पवयीन तरुणाचा पोहताना डोहात जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव विशाल जोगिंद्र मोहिने वय 15 वर्षे रा बिडगाव तालुका कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा आपल्या 12 मित्रासह कन्हान नदीच्या कडेला असलेल्या हड्डी कंपणीच्या मागे असलेल्या नेरी नदी पात्रात उडी मारून पोहत असता पोहण्याच्या छंदात रमलेले स्थितीतुन इतर 12 मित्र नदीबाहेर आले मात्र सदर मृतक हा नदिबाहेर न आल्याने सर्वांना आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते तर सदर मृतक ला पोहता येत असतानाही नदीबाहेर न आल्याने उपस्थित मित्रानी पुनश्च नदीत उडी घेऊन सदर मृतक तरूनाला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र शोधकामी अपयश आल्याने सर्वांनी आपल्या घरी पळ काढून वास्तुस्थिती मृतक मुलाच्या वडीलाला सांगितले .

Advertisement

यासंदर्भात फिर्यादी जोगिंदर मोहिने यांनी स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून जलतरण पथक च्या माध्यमातून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळ झाल्याने शोधकामाला थांबा देत आज सकाळी शोधकामाला गती दिली असता अंतता मृतदेह शोधण्यात यशप्राप्त झाले व मृतदेह हा नदीच्या डोहातील दलदल मध्ये अडकले होते.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. पोहण्याच्या नादात एका अल्पवयीन तरुणाचा मृत्यू होण्याच्या घटनेवर बिडगाव वासीयात शोककळा पसरली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement