Published On : Fri, Jul 24th, 2020

आसोलामेंढा धरणावरील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्या – विजय वडेट्टीवार

नागपूर : आसोलामेंढा (जिल्हा- चंद्रपूर) धरणावर पर्यटन विकासाची कामे करण्यासाठी 25 कोटींचा निधी देण्यात येईल. याबाबत शासनाकडे त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प तसेच बाधित क्षेत्रातील विकास कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जे. एम. शेख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता बी. एस. स्वामी, अधीक्षक‍ अभियंता के. एस. वेमुलकोंडा, अंकुर देसाई, जे. डी. बोरकर यावेळी उपस्थित होते.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आसोलामेंढा धरणाच्या बुडित क्षेत्रातील चार गावांच्या भूसंपादनाच्या दराबाबत भूधारकांनी प्राधिकरणाकडे याचिका दाखल करावी. भूसंपादनाच्या दराबाबत प्राधिकरणातील पिठासीन अधिकारी निर्णय घेतील. मेंडकीसह मानिकपूर रिठ, गणेशपूर, नवेगावंखुर्द, कोरेगांव रिठ, शिवसागर गावगल्ला तसेच शिवसागर तुकुम या गावांचा सुमारे 2 हजार 80 हेक्टर सिंचन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित सादर करावा. घोडाझरी शाखा कालव्याच्या एकूण लाभक्षेत्रात नागभीड, सिंदेवाही, मूल व सावली हे चार तालुके येत असून एकूण 120 गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. घोडाझरी कालव्याच्या उर्वरित कामांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी या वर्षीच्या पूरक अनुदानातून देण्यात येईल. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना त्यांनी केली.

चिचडोह बॅरेजचे काम त्वरित पूर्ण करावे
गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजच्या पोचमार्गावरील दोन्ही पुलांच्या निविदा अंतिम करून काम त्वरित पूर्ण करण्यात याव्या. तसेच चिचडोह बॅरेजच्या बुडित क्षेत्रातून तळोधी मोकासा या उपसा सिंचन योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, जेणेकरून या प्रकल्पातील निर्मित पाणीसाठ्याचा शेतकऱ्यांना उपयोग होईल. चिचडोह प्रकल्पामधून राजीव उपसा सिंचन योजनेचा आराखडा त्वरित मंजूर करण्यासाठी राज्यस्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल.

मध्यम पाटबंधारे प्रकल्प, पुनर्वसन, बाधित क्षेत्रातील विकास कामे याबाबत यावेळी चर्चा करून संबधितांना निर्देश देण्यात आले.

Advertisement
Advertisement