Published On : Fri, Jul 24th, 2020

वारेगाव च्या कोविड-19 क्वारनटाईन सेंटर सुसज्ज

Advertisement

कामठी :-कामठी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आजपावेतो आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 300 च्या वर गेली असून 100 च्या आत रुग्ण हे कोरोनावर मात करून घरी परतले असले तरी 6 रुग्ण हे कोरोनाच्या विळख्यात अडकून मृत्युमुखी पडले आहेत अशा परिस्थितीत कामठी तालुका प्रशासन या कोरोना महामारीच्या लढाईत कोरोना योद्धाची भूमिका साकारून स्वतःचा जीव धोक्यात घालून परिस्थितीत नियंत्रणात आणण्यात प्रयत्नशिल आहेत.एखादा रुग्ण हा कोरोना पॉजिटिव्ह आढळल्यास त्या रोगाचा प्रादुर्भाव इतरांनाही न पसरावा या खबरदारी घेण्याच्या माध्यमातून त्या कोरोना बाधित रुग्णाच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या कुटुंबियांना तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींना गृह विलीगिकरन न करता कोविड सेंटर मध्ये विलीगिकरन करण्यात येते यानुसार कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने वारेगाव येथील अनुसूचित जाती जमाती मुलांचे वसतिगृह असलेल्या इमारतीला कोविड सेंटर म्हणून उपयोगात आणण्यात येत आहे.

याइमारतीचे दररोज सॅनिटायझर करुन देता येत आहे तसेच या कोरोणटाईन सेंटर मध्ये ठेवलेल्या संशयित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येते या तपासणीत संपर्कातून पीजीटिव्ह आढळल्यास त्यांना नागपूर च्या आयसोलेशन वार्डात हलविले जाते मात्र तोवर यांची काळजी घेण्याच्या उद्देशातून सर्व सुविधायुक्त सज्ज केलेले असते.

तर खुद्द तहसीलदार अरविंद हिंगे व बीडीओ सचिन सूर्यवंशी दररोज सकाळी 11 वाजता या वारेगावच्या कोविड-19कोरोन्टाईन सेंटर ला भेट देऊन खुद्द जेवण करून कोरिनटाईन असलेलयाना ताजे व चवदार जेवण मिळते की नाहो या तपासणी साठी खुद्द जेवणाचा आस्वाद घेत आहेत.

संदीप कांबळे कामठी