Published On : Fri, Jul 24th, 2020

नवीन सौरऊर्जा धोरणासाठी उच्चस्तरिय समितीचे गठन

Advertisement

नागपूर : राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची प्रामुख्याने सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीचे गठन करण्यात आले असून यासंदर्भात ऊर्जा विभागाने शासन परिपत्रक जारी केले आहे. यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी निर्देश दिले आहेत.

ही समिती अपारंपरिक ऊर्जा निर्मितीस प्राधान्य देऊन राज्याचे सर्वसमावेशक ऊर्जा धोरण तयार करून शासनास शिफारस करणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी लँड बँक तयार करण्यात येणार आहे. तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश व राजस्थान या शेजारील राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांचा अभ्यास करून शासनास शिफारशी सादर करणार आहे.

Gold Rate
09 july 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver/Kg 1,08,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी लँड बँक तयार करण्यासाठी लवकरच एका कंपनीची स्थापना करण्यात येणार असून याची संरचना व कार्यप्रणाली या बाबतीत निर्णय घेण्यात येणार आहे. प्रकल्प उभे करण्यासाठी व त्यासाठी असलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सौर ऊर्जा धोरण निश्चित करण्यासाठी ऊर्जा विभागाला उच्च स्तरीय समितीचे गठन करण्याचे निर्देश काल विभागाच्या बैठकीत दिले होते.महावितरण, महापारेषण व महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच महाऊर्जाचे महासंचालक हे या समितीचे सदस्य राहणार असून ऊर्जा विभागाचे उपसचिव किंवा सहसचिव हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत.

Advertisement
Advertisement