Published On : Tue, Aug 3rd, 2021

कोराडी वीज केंद्रात ए.बी.यु.कंस्ट्रक्शन तुपात कंत्राटी कामगार दुखात

– कोराडी वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांची पिळवणूक थांबवा,कोराडी वीज केंद्राची कंत्राटी कामगारांविषयी मूक भूमिका,उपमुख्य अभियंता यांनी ए.बी.यु. कंस्ट्रक्शन ला पाठिशी घातले

कोराडी: ६६०, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथील राख हाताळणी विभागातील कंत्राटदार ए.बी.यु.कन्स्ट्रक्शन,चंद्रपूर या कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांचे प्रचंड शोषण व पिळवणूक सुरू आहे. येथील कामगारांच्या समस्या सोडविण्याकरीता कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांना ६६० कोराडी वीज केंद्राच्या मुख्य द्वारावर निवेदन दिले. राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे कामगार समस्या निवारणबाबत पाठपुरावा करून कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी वर्गावर कार्यवाही करावी,अशी मागणी केली.

ए.बी.यु.कन्स्ट्रक्शन,चंद्रपूर ला ज्या कामगारांनी कोट्यावधी रूपये मिळवून दिले. ते कामगार आता देशोधडीला लागले आहे.

त्यांच्यावर उपासमारीची,बेरोजगारीची पाळी आली आहे.मासिक वेतन दोन टप्प्यात दिले जाते. कामाच्या कार्यारंभ आदेशात नमूद नियमावली प्रमाणे राख हाताळणी विभागाने कामगारांना कंत्राटदाराकडून सोयीं सुविधा पुरविण्यासबंधी पडताळणी करणे आवश्यक आहे. कोराडी वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता सुनील सोनपेठकर (प्रशासन) यांच्या अध्यक्षतेखाली राख हाताळणी विभागातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी दि. २६ जून २०१९ व दि. २९ नोव्हेंबर २०१९ रोजी बैठकी पार पडल्या. ज्यात प्रामुख्याने कोराडी वीज केंद्राचे कल्याण अधिकारी,सहायक कल्याण अधिकारी, कार्यकारी अभियंता रा.हा.वि., अति.कार्य.अभियंता, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, कंत्राटदार भरत पटेल उपस्थितीत होते. वर्षानुवर्षे कामगारांनी हताशपणे पहात बसायचे काय? अधिकारी यांच्या लक्षात येऊनही कंत्राटदाराला देयक अदा का केले जाते, काम व्यवस्थित नसेल, तर जबरदस्त दंड ठोठावणे, काळ्या यादीत नाव टाकणे असे उपाय करणे अपेक्षित आहेत; पण कोराडी वीज प्रशासनाची भूमिका मूक असून संशयास्पद आहे.

कंत्राटदार भरत पटेल, चंद्रपूर चे असल्याने ते कामगार हिताचे नसून अधिकाऱ्यांचे आर्थिक हित जोपासणारे आहेत.असे भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले. राख हाताळणी विभागातील कंत्राटी कामगार मागील तीन वर्षांपासून दुर्लक्षित राहिले आणि आजही ते दुर्लक्षित आहेत. एखाद्या कामगाराला काही कारणांमुळे गैरहजर रहावे लागले किंवा कामावर यायला उशीर झाला तर त्याच्यावर ए.बी.यु.कन्स्ट्रक्शन कडून वेतन कपातीसह कठोर कार्यवाही केली जाते.अपुरे वेतन, कामाच्या ठिकाणी अन्य कोणत्याही सुविधा न देता राबवून कामगारांची पिळवणूक करण्याच्या घटना वारंवार उघड झाल्या आहेत.

कोराडी वीज केंद्राच्या सुस्त धोरणामुळे आणि कंत्राटदार ए.बी.यु.कन्स्ट्रक्शन सोबत उपमुख्य अभियंता सुनील सोनपेठकर सह राख हाताळणी विभागातील इतर अधिकाऱ्याचे संगनमत असल्याने
कंत्राटदारावर कार्यवाही करण्याचे टाळले जाते. कंत्राटी कामगार हवालदिल झाले असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून न्यायाची अपेक्षा आहे.
कोरोना महामारीत फ्रन्टलाईन वर्करच्या बरोबरीने राख हाताळणी विभागातील कंत्राटी कामगार काम करत आहेत. कामगारांची सुरक्षा रामभरोसे असून कोराडी वीज केंद्राचे व्यवस्थापन ढिसाळ आहे. .

गेले वर्षभर कोरोनाने लोकांना छळले आहे. कामगार आणि श्रमिक आज अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस या कामगारांना न्याय मिळवून देणारच, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी दिली.यावेळी सतीश चवळीपांडे,रांजण पिंपळे,रामदास निंदेकर,विकास गोंडाणे,निखिल गणवीर,राजेश कांबळे,राजू पवार,संदीप माटे,केदारनाथ कटरे,विलास अतकरी,बंडू धोटे, दत्तू पंचभाई,महेंद्र कुंभलकर, नीतीन जवारे,लहू अडबैल,प्रणय हेटे,गौतम रंगारी, स्वप्नील फुटाणे, सुनील पवार,किशोर जनबंधु,प्रवेश कापसे,भारत ठाकरे,मयूर हटवार,अमर वाघमारे,विजय राजभर,बासू चॅटर्जी, मनोज निंबार्ते, नेहाल कुंटेनवार,शिवम उपाध्याय, सूरज चोलकर,अवकेश पावर,राहुल मस्की,निखिल जनबंधु,बादल बटटे, मनीष हुमने,प्रफुल नारनवरे,दुर्गेश खवले,चेतन चव्हाण,सावन नकोसे,अजय यादव,सतीश बन्सोड,भारत अंबादे,राहुल धांडे,अनिल राऊत, संतोष राऊत,आशिष भोयर,चंद्रशेखर काकडे,दयाराम चिंचोळकर,जगन्नाथ प्रसाद,आशिष वाळके,प्रवीण गाढवे,राजेश दाभेकर,ज्ञानेश्वर कराळे,दिनेश मलघाटे,रामदास रहांगडाले,विजय ठाकरे,संतोष वाघमारे,मनोज यादव,श्रीकांत चुनरीयाँ,सुरेश पवार,सुनील शेंद्रे,विक्की देवांगण, चंदन कुरील,सुनील शेंद्रे,जितेंद्र तील्लीखेडे,प्रशांत गवळी,अनिल घुघल, चंद्रकला बावणे,सतीश शेंद्रे,पुरुषोत्तम तील्लीखेडे,सुनील मिटकर,दिनेश प्रधान,उदय रोहनकर, कोमल रक्षा,सूरज ढेंगरे, लखन चौधरी, राधेश्याम वरखडे व शेकडो कामगार उपस्थितीत होते.

ए.बी.यु.कन्स्ट्रक्शन,चंद्रपूर कडून महिनेवारी वेतन दोन टप्प्यात दिले जाते.कंत्राटदाराला विचारले असता तो राखड उचलण्याच्या कामावर बदली करतो न केल्यास कामावरून कमी करण्याची धमकी देतो.

संदिप माटे,राख हाताळणी विभाग, कोराडी वीज केंद्र
राख हाताळणी विभागातील हाऊस किपींग चे काम असमाधानकारक म्हणून कोराडी वीज केंद्राने ए.बी.यु.कंस्ट्रक्शन ला दंड ठोठावला.त्याने दंडाची रक्कम कामगारांच्या मासिक वेतनातून कपात करण्याची नोटीस कामगारांना दिली.अशा मनोरुग्ण वृत्तीला आळा न घातल्यास कामगार पेटून उठले.

केदारनाथ कटरे,कंत्राटी कामगार, राख हाताळणी विभाग,कोराडी वीज केंद्र
” कोराडी वीज केंद्रात अत्यल्प मोबदल्यात कामगारांचे आर्थिक शोषण व पिळ‌वणूक नवीन नाही.
नोकरी जाण्याच्या भितीपोटी कामगार तक्रारी करत नाहीत. कंत्राटदाराला देण्यात येणाऱ्या वर्क ऑर्डर मध्ये नमूद अटी व नियमानुसार कामगारांना वेतनभत्ते व सोयीसुविधा मिळाव्यात.याची पडताळणी करणे मुख्य अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे.

उषा रघुनाथ शाहू,कामठी विधानसभा अध्यक्षा,राष्ट्रवादी महिला काँग्रेस

कोराडी वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता सुनील सोनपेठकर यांनी मागील अडीच वर्षांपासून ए.बी.यु.कन्स्ट्रक्शन,चंद्रपूर या कंत्राटदारावर कार्यवाही न करता त्याला पाठीशी घातले. कंत्राटदाराचा कोट्यवधींचा फायदा करून कामगारांचे नुकसान केले. कोराडी वीज केंद्राच्या भ्रष्टाचारी कारभाराचा फटका मागील तीन-चार वर्षांपासून राख हाताळणी विभागातील कामगारांना सहन करावा लागत आहे.

भुषण चंद्रशेखर,जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर (ग्रा)