Published On : Fri, Jul 12th, 2019

म.न.पा.कर्मचा-यांना १२ टक्के महागाई भत्ता लागू केल्याबद्दल

मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे मा.महापौर व आयुक्तांचे अभिनंदन

नागपुर: राज्य शासनाने सुधारित वेतन श्रेणीत वेतन घेणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दिनांक १ जूलै २०१९ पासून १४८ टक्के वरूण १५४ टक्के म्हणजेच १२ टक्के महागाई भत्ता मंजुर केलेला आहे. याच धर्तीवर नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणा-या नियमित आस्थापनेवरील कर्मचा-यांना व शिक्षकांना जूलै पेड इन ऑगस्ट २०१९ पासून १२ टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्याच्या निर्णय म.न.पा.प्रशासनाने घेतला आहे. तसे परिपत्रकसुध्दा जारी करण्यात आलेले आहे.

म.न.पा. कर्मचारी व शिक्षकांना शासन निर्णयाप्रमाणे त्वरित महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात नूकतेच नागपूर महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे मा.महापौर व मा.आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते व पाठपुरावा सुध्दा करण्यात आला होता. संघटनेची मागणी प्रशासनानी मान्य केल्याबद्दल आज मा.महापौर श्रीमती नंदा जिचकार यांचे नागपूर महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सचिव श्री.अशोक कोल्हटकर यांनी पुष्पगुच्छ व अभियंता कल्पना मेश्राम यांनी तुळशीचे रोपटे देवून मा.महापौर यांचे अभिनंदन केले.

यावेळी नगरसेविका श्रीमती रूपा राय, संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री. विनोद धनविजय, जयंत बंसोड, विशाल शेवारे, संजय बागडे, राजेश हाथीबेड, गौतम पाटील, उमा तिवारी, ज्योती जाधव, सुषमा नायडू, किरण बोंबले, राजेश वासनिक, दिलीप तांदळे, मनोज मिश्रा, कल्याण गजभिये, चंद्रमणी रामटेककर, अल्का गावंडे, नरेश खरे, रघुनाथ खोरगडे, प्रमोद बारई, राजू मेश्राम, चंदू पेंडके व बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.