Published On : Tue, Nov 13th, 2018

नागपूर महापालिकेच्या आयुक्‍तपदी अभिजीत बांगर

Advertisement

मुंबई – नागपूर महापालिकेच्या आयुक्‍तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती मंगळवारी राज्य शासनाने केली. याशिवाय चार आयएएस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली.

बांगर हे अमरावतीचे जिल्हाधिकारी होते. महाबीज; अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख हे आता अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी असतील.

Advertisement
Advertisement

आतापर्यंत नागपुरात आयुक्त असलेले वीरेंद्र सिंह यांची बदली कौशल्य विकास आयुक्तपदी करण्यात आली आहे. राज्याचे अपंग कल्याण आयुक्त रुचेश जयवंशी यांची बदली हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. हिंगोलीचे सध्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी हे अकोला येथील महाबीजचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement