Published On : Tue, Aug 4th, 2020

खैरीच्या फॉर्म हाऊस मध्ये मौज मस्ती करायला गेलेल्या तरुणाचा नाल्यात पडल्याने मृत्यू

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खैरी गावाच्या कडेला असलेल्या एका पॉश फॉर्महॉऊस मध्ये मित्रांसोबत मौज मस्ती करुन घरी परत जात असलेल्या एका 32 वर्षोय तरुणाचा तारा नगर च्या नाल्यात बुडाल्याने दुर्दुवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी साडे आठ दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव मो वहिद मो सहीद अन्सारी वय 25 वर्षे रा मोमीनपुरा नागपूर असे आहे.

प्राप्त माहीती नुसार सदर मृतक तरुण हा खैरी च्या फॉर्म होऊस मध्ये मित्रासोबत जात असल्याचे सांगून घटनेच्या एक दिवसअगोदर घरून निघाले असता मित्रासोबत सदर फॉर्म होऊस मध्ये थांबून सकाळी घरी जाण्यासाठी निघाले असता या फॉर्म होऊ स च्या कडेला असलेल्या तारानगर चौक जवळील नाल्यावर तुडुंब पाणी भरलेला असूनही हा नाला ओलांडून घरी जाण्याच्या बेतात नाला ओलांडून जात असता अचानक संतुलन बिघडून सदर तरुण नाल्यात खाली पडून बुडाल्याने दुर्दुवी मृत्यू झाल्याची घटना घडली असता सर्वत्र हळहळ व्यक्त करीत सोबत असलेल्या मीत्रांनी घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले. घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवोदास कठा ळे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

बॉक्स:-सदर मृत्यू प्रकरणात फॉर्म होऊस ला पोलिसांनी भेट देत कसून चौकशी करीत आहेत त्यातच मोमीनपुरा नागपूर चे तरुण मंडळी ही कामठी तालुक्यात येणाऱ्या खैरी गावातील फॉर्म होऊस मध्ये कुठल्या कामानिमित्त आले, रात्रभर कसे थांबले अशा विविध चर्चेला पेव फुटले आहे

संदीप कांबळे कामठी