Published On : Tue, Aug 4th, 2020

नामांतर आंदोलनातील शहीदांना भाजपाच्या वतीने अभिवादन

नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनातील शहीदांना मंगळवारी (ता.४) भारतीय जनता पार्टी तर्फे अभिवादन करण्यात आले. कामठी मार्गावरील १० नंबर पुलावरील नामांतर शहीद स्मारक स्थळी भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्प अर्पण करून संवेदना व्यक्त केल्या.

याप्रसंगी माजी आमदार डाॅ. मिलींद माने, अनुसूचित जाती मोर्चा महामंत्री सतीश शिरसवान, मंडळ अध्यक्ष संजय चौधरी, नेताजी गजभिये, शंकरराव मेश्राम, रोहन चांदेकर, रवींद्र डोंगरे, वैशाली साखरे, अशोक बन्सोड, ओमप्रकाश इंगळे, स्वप्नील भालेराव, आनंद अंबादे, अनिल झोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.