Published On : Sat, Nov 2nd, 2019

कुंभारे कॉलोणीत महिलेचा महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला

कामठी : स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी येथील भुराजी मंदिर जवळ राहणाऱ्या एका महिलेवर जुन्या वैमनस्याचा वचपा काढण्याच्या उद्देशाने जवळपास पाच ते सहा महिला आरोपीनि संगनमताने धारदार शस्त्र , चाकू ने मानेवर, गळ्यावर वार करून तसेच लोखंडी हतोडीने पायावर वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना सकाळी साडे आठ दरम्यान घडली असून गँभिर जख्मि महिलेचे नाव निखत खान साजिद खान वय 35 वर्षे असे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसानी गंभीर जख्मि महिलेला त्वरित ताब्यात घेत उपचारार्थ कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र परिस्थिती अजूनच नाजूक असल्याने जख्मि महिलेला त्वरित नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले यासंदर्भात जख्मि फिर्यादी महिला निखत खान साजिद खान रा कुंभारे कॉलोनी कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पाच ते सहा आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला तर यातील दोन महिला आरोपी मायलेकिना अटक करण्यात आले.अटक महिला आरोपी मध्ये नंदिनी उर्फ साएबा पसेलकर वय 20 वर्षे (मुलगी), गफ्फु उर्फ शबनम पसेलकर वय 45 वर्षे (आई) दोन्ही राहणार अशोक चौक , मैतर पुरा नागपूर असे आहे तर तसेच इतर तीन ते चार आरोपी पसार असून अजूनही पोलिसांच्या अटकेबाहेर आहे.

संदीप कांबळे कामठी