Published On : Sat, Nov 2nd, 2019

कामठी रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारासमोरुन सतरा वर्षाच्या मुलाचे अपहरण

अज्ञात आरोपीविरुद्ध नवीन कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Kidnapping

कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या लिहिगाव येथील 8 वर्षीय सुजल नेपाल वासनिक नामक मुलाचे अपहरण केल्याची घटना 2017मध्ये घडली होती या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश प्राप्त झाल्याने पोलिसानी हात टेकून दिले तर त्याच गावातील एका 17 वर्षीय मुलाचा आज सकाळी 10 वाजता कामठी रेल्वे स्टेशनच्या प्रवेश द्वारासमोरून अपहरण झाले असून अपहरण झालेल्या मुलाचे नाव आदेश नरेश शुक्ला वय 17 रा लिहिगाव ता.कामठी असे आहे.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश शुक्ला हे मूळचे गोंदिया येथी रहिवासी असून गेल्या 15 वर्षांपासून नवीन कामठी पोलीस ठाण्यात हद्दीतील लिहिगाव परिसरातील एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक मणून कार्यरत आहेत तर लिहिगावात भाड्याचे घर घेऊन कुटूंबास वास्तव्याला आहेत दिवाळी निमित्य पत्नी विनिता व 17 वर्षांचा आदेश मुलासह गोंदिया येथे मूळ गावी गेले होते आज सकाळी 10,15 वाजता सुमारास तीघेही गोंदीडीयावरून महाराष्ट्र एक्स्प्रेस ने कामठी रेल्वे स्टेशन वर पोहोचले तिघेही प्रवेशदवारावर उभेराहून नरेश शुक्ला रेल्वे स्टँड वर ठेवलेली मोटार सायकल आनण्यासाठी गेले असता मुलगा आदेश आई वनिता ला सांगून मी हॉटेल मधून नास्ता करून येत असल्याचे सांगून निघून गेला

त्याचवेळात वडील नरेश शुक्ला आई जवळ येऊन आदेश बद्दल विचार पूस केली बराच वेळ होवू लागली आदेश परत न आलयांमुळे आई वडिलांनि रेल्वे स्टेशन,परिसर व इतर नाते वाईकांकडे शोधाशोध केली परंतु कोठेही मिळून आला नाही, आदेश शुक्ला हा 12 व्या वर्गात विद्यान शाखेत नवोदय विद्यालय खैरी नवेगाव पेंच तालुका परशिवणी येथे वसतिगृहात राहून शिकत आहे, आई वडिलांनी तेथेही जाऊन सर्वत्र चौकशी केली परंतु आदेश कोठेही दिसून आला नाही .

आदेश चे वडील नरेश शुक्ला यांनी सायंकाळी 7 वाजता सुमारास नवीन पोलीस स्टेशन गाठून आदेश चे अपहरन झाल्याची तक्रार केली असून पोलिसांनी कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत

लिहिगावातील 16 सप्टेंबर 2017 ला सुजल वासनिक वय 8 या मुलाचे ओहरण झाले होते दोन वर्षांचा काळ लोटून गेला परंतु अजूनही सुजल चा शोध पोलीस घेऊ शकते नाही ही पुनरावृत्ती आदेश शुक्ला सोबत तर होणार नाही अशी सर्वत्र चर्चा दिसून येत आहे

संदीप कांबळे कामठी