Published On : Fri, Jul 19th, 2019

केंद्रीय विद्यालयात शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण

Advertisement

कामठी :-शालेय जीवनात शिस्त आणि अनुशासनाचे प्रतीक म्हणून मानल्या जाणाऱ्या शिक्षणप्रणालीतून शिक्षण देणाऱ्या कामठी येथील नामांकित केंद्रीय विद्यालयातील एका विज्ञान विषयाच्या शिक्षकाने केंद्रिय विद्यालयातील आठवि ते नववी च्या जवळपास 70 ते 80 विद्यार्थ्यांना लाकडी काठीने मारहाण केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून मारहाण करणाऱ्या या शिक्षकाचे नाव अजय चौखीकर असे आहे.

प्राप्त माहितीनुसार कामठी येथील छावणी परिषद परिसर अंतर्गत येणाऱ्या केंद्रिय विद्यालयात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत प्रत्येकी 3 तुकड्या असून एकूण 1408 विद्यार्थी विद्यार्जन करीत आहेत. शाळेतील वर्गविषयानुसार 8 वि तसेच 9 वी वर्गाच्या विद्यार्थ्यांना शालेय परिपाठ झाल्यानंतर पुढील विषयाच्या वर्गशिक्षणासाठी बोलावलयावरून सदर शिक्षकाने संतापून आठवी ते 9 वीच्या 242 विद्यार्थ्यापैकी जवळपास 70 ते 80 विद्यार्थ्यांना लाकडी काठीने मारहाण केली.विद्यार्थ्यांनी भीतीपोटी हा त्रास कसाबसा शाळेत सहन करून घरी गेल्यावर विद्यार्थ्यानि आपल्या पालकांना आपबीती सांगल्यावर पालकांचे मन दुखावले यावर संबंधित

शाळेच्या वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीवरून या शाळेचे चेअरमेन पंकज मल्होत्रा छावणी परिषद चे अध्यक्ष मानले जाणारे सैन्य विभागाचे ब्रिगेडियर यांनी शाळेची तपासणी करीत केलेल्या शहनिशातून विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्या कारणाने विद्यार्थ्यांना मारहाण करणारे शिक्षक अजय चौखीकर यांना शाळेत येण्यास प्रवेश बंदी घातली. तसेच या प्रकरणात शालेय व्यवस्थापण तसेच शाळेच्या प्राचार्यांच्या आदेशानव्ये सदर प्रकरणात चौकशी करिता 5 शिक्षकांची नियुक्ती करून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.या चौकशी अहवालाची प्रत मा.उपायुक्त केंद्रिय विद्यालय मुंबई यांना पाठविण्यात येणार असून यासंदर्भात सदर शिक्षक दोषी आढळल्यास त्या शिक्षकांच्या निलंबनाची कारवाहिस्तव शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती कामठी पंचायत समिती चे गटशिक्षण अधिकारी कश्यप सावरकर यांना दिलेल्या चौकशी अहवालात सादर केले.

प्राचार्य कोंबाडे:-या प्रकरणाची माहिती कळताच संबंधित शाळेचे चेअरमेन, ब्रिगेडियर यांनी शाळेची पाहणी केलयावरून पाच शिक्षकांची चौकशी समिती गठीत करण्यात आली असून या चौकशी अहवालाच्या आधारावर वरीष्ठकडे हा अहवाल सादर करून पुढील कारवाहिस्तव सादर करण्यात येईल तसेच घडलेल्या प्रकाराबाबत निंदनीय चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच शिक्षक अजय चौखीकर हे या शाळेत मागील दोन वर्षांपासून या शाळेत कार्यरत असून यापूर्वी आमला येथील केंद्रिय विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते यांच्यावर आरोप केलेल्या विद्यार्थ्यांना मारहाणाची हा प्रकार पहिल्यादाच चर्चेत आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे हे इथं विशेष….

बॉक्स:-या संदर्भात ‘छडी लागे छमछम विद्या येई झमझम’ही प्रथा केव्हाची बंद झाली असून शिक्षकांच्या संतापातून विद्यार्थ्यांना केलेली मारहाणीचा प्रकार हा निंदनीय चिंतेचा विषय असल्याने विद्यार्थ्यांशी असा अपमानास्पद व विद्यार्थ्यांना भीतीदायक ठरणारा या प्रकाराद्दल संबंधित शिक्षक अजय चौखीकर यांना शाळेतून निलंबीत करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्च्यांचे शहर महामंत्री प्रमेन्द्र यादव यांच्या नेतृत्वात पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.याप्रसंगी अरुण पोटभरे, सोमेश जेटली, राकेश शुक्ला, जितू मंगतानी, संदीप कनोजिया आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी