Published On : Fri, Jun 4th, 2021

निराधारासाठी दोन दिवसाचे कोव्हिड लसीकरणाचे विशेष मोहीम

Advertisement

पहिल्या दिवशी 88 स्त्री निराधार लाभार्थींचे प्रथम डोजचे लसीकरण पूर्ण

नागपूर : दि. 04.06.2021 ला नागपूर महानगरपालिका मंगळवारी झोन कार्यालय क्र. 10 अंतर्गत झोनच्या सभापती व नगरसेविका सौ. प्रमिला मथरानी यांच्या शुभहस्ते मिशनरी ऑफ चॅरीटीस मदर टेरेसा होम शांती भवन, काटोल रोड, नागपूर येथे दोन दिवसीय कोव्हिड लसीकरण विशेष मोहीमेचा शूभारंभ करण्यात आला. या मदर टेरेसा होम शांती भवनात एकूण 78 पुरूष व 88 महिला असे एकूण 166 निराधार नागरीक राहत असुन या सर्वांकडे आधार कार्ड किंवा तत्सम कोणतेही शासन मान्य ओळखपत्र नसतांना सुध्दा विशेष मोहीम राबवुन नागपूर महानगरपालिकाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी मंजुरी प्रदान केली तसेच लसीकरण समन्वयक डॉ. गोवर्धन नवघरे यांनी या लसीकरण मोहीमेच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

या मदर टेरेसा होम शांती भवनातील सिस्टर मॅकडॅलिट, सिस्टर जूडीथा व सिस्टर लियान्डर यांच्या सहयोगाने एकूण 88 स्त्री निराधार लाभार्थींचे प्रथम डोजचे लसीकरण प्रथम दिवशी पूर्ण करण्यात आले. त्याप्रमाणेच दूस-या दिवशी उर्वरीत 78 पूरूष निराधार लाभार्थींचे लसीकरण करण्यात येईल.

या दोन दिवशीय लसीकरण मोहिमेसाठी झोन चे सहा. आयुक्त श्री विजय हुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली व झोनल वैद्यकीय अधिकारी श्री अतिक उर रहमान खान यांच्या देखरेखीखाली डॉ. साक्षी ठाकरे यांनी लसीकरण केले. तर संगणक चालक श्री भूपेश बिनकर यांनी संगणकावर नोंदी पूर्ण केल्यात. आशा वर्कर प्रियंका कापसे व माया कावळे यांनी सहकार्य केले. झोनस्तरीय समन्वयक श्री पुरूषोत्तम कळमकर व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक उर रहमान खान यांनी या विशेष मोहीमेच्या यशस्वीतेकरीता सर्वांचे आभार व्यक्त केले.