Published On : Tue, Jun 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील शहीद गोवारी फ्लायओव्हरवरील हाइट बॅरियरमध्ये अडकला फ्युल टँकर!

वाहतूक ठप्प तर बॅरियरचे झाले नुकसान
Advertisement

नागपूर:शहीद गोवारी फ्लायओव्हरवरील अवजड वाहनांच्या वर्दळीवर आळा घालण्यासाठी सोमवारी रात्रीच दोन्ही टोकांना लावण्यात आलेले हाइट बॅरियर मंगळवारी सकाळीच एका फ्युएल टँकरच्या धडकेत नुकसानग्रस्त झाले. या टँकरमध्ये रिलायन्स कंपनीचे तब्बल २३,००० लिटर पेट्रोल भरलेले होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सीताबर्डी परिसरातील शहीद गोवारी फ्लायओव्हरवर सोमवारी रात्री उशिरा दोन्ही बाजूंना हाइट बॅरियर लावण्यात आले होते. उद्दिष्ट होते संकटकालीन व अवजड वाहनांच्या आवाजाहीमुळे त्रस्त छोट्या वाहनचालकांना दिलासा देणे. परंतु, आज मंगळवारी सकाळी एक फ्युएल टँकर या बॅरियरमध्ये अडकला आणि त्यामुळे नव्याने बसवलेले बॅरियर वाकले व मोडले गेले.

Gold Rate
02 Aug 2025
Gold 24 KT 99,800 /-
Gold 22 KT 92,800/-
Silver/Kg ₹ - ₹- ₹1,11,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या टँकरला बाहेर काढण्यासाठी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत. सध्या टँकर बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही अशा प्रकारचे हाइट बॅरियर लावण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु त्यावेळीही काही तासांतच अवजड वाहनांमुळे ते खराब झाले होते. आता पुन्हा एकदा हाच इतिहास पुनरावृत्त झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वाहतूक विभाग आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, पुढील उपाययोजनांबाबत विचार सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांतून देखील प्रशासनाच्या हलगर्जीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या घटनेमुळे काही काळाकरीता वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement
Advertisement