नागपूर– नागपूरमध्ये आज दुपारी एक दुर्मिळ आणि मनमोहक निसर्ग दृश्य पाहायला मिळाले. सूर्याभोवती तयार झालेले वलय (Halo) नागपूरच्या आकाशात स्पष्टपणे दिसले आणि अनेकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. या निसर्ग घटनेचे लक्ष राठी यांनी काही विलक्षण फोटो टिपले असून, त्यांनी हे क्षण माध्यमांसोबत शेअर केले आहेत. या अद्भुत दृश्याने नागरिकांना थक्क केले आणि सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सूर्याभोवती हे वलय कधी आणि का येतं?
सूर्याभोवती या वलय येण्याच्या प्रक्रियेस मराठीत सूर्याभोवतीचे प्रभामंडळ असे म्हणतात. शुक्रवारी सकाळी उत्तर भारतात हे सूर्याभोवतीचे वलय पहायला मिळाले. ही एक साधरण खगोलीय घटना आहे ज्याला भौगोलिक भाषेत ‘सोलार हेलो’ म्हटले जाते. जेव्हा सूर्य पृथ्वीच्या 22 अंशात असतो, त्यावेळी आकाशात 20 हजार फुटांवर सिरस क्लाऊडमुळे (आर्द्रता असलेले असे ढग ज्यांचा थर अतिशय पातळ असतो) हे गोलाकार कडं बनतं. बऱ्याचदा या वलयात इंद्रधनुष्याचे सप्तरंग देखील आढळून येतात.
सूर्य किंवा चंद्राची किरणे सिरस ढगांमध्ये असलेल्या हेक्सागोनल बर्फाच्या कणांच्या माध्यमातून परावर्तित होऊन हे वलय तयार होते. हे दृश्य पाहणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. मी ते पाहताच लगेच फोटो घेतले आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. अशी दुर्मिळ दृश्ये निसर्गाच्या अद्भुततेची जाणीव करून देतात, असे राठी म्हणाले आहेत.
हे वलय नागपूर शहराच्या विविध भागांतून स्पष्टपणे पाहायला मिळाले. अनेक नागपूरकरांनी याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले असून, हे दृश्य संपूर्ण शहरासाठी एक खास आठवण ठरले आहे.