Published On : Tue, Oct 19th, 2021

Video : कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर निर्माणाधीन पुलाचा एक भाग कोसळला

कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास कोसळला.

नागपूर: कळमना मार्केटकडे जाणाºया मार्गावर असलेल्या भारतनगर चौकात निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या पुलाचा एक भाग पडण्याआधी तेथून एक चारचाकी गाडी गेली होती. या गाडीत अख्खे कुटुंब होते. अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने या कुटुंबियांचे प्राण वाचल्याची चर्चा येथे होत होती.