Published On : Thu, Sep 12th, 2019

नागपूर महानगरपालिका व इंडियन ऑईल कॉर्पोरेश लि.मध्ये सामंजस्य करार

तलावांच्या स्वच्छतेसाठी करणार ‘फ्लोटिंग बोट’ संचालित

नागपूर : शहरातील तलावांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेला इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबईचे सहकार्य लाभले आहे. तलावांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक ‘रिमोट कंट्रोल फ्लोटिंग बोट’बाबत नागपूर महानगरपालिका व इंडियन ऑईल कॉर्पोरेशप लिमिटेड मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

गुरूवारी (ता.१२) मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीमध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.चे (महाराष्ट्र कार्यालय) कार्यकारी निदेशक (प्रभारी) मुरली श्रीनिवासन आणि नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी ह्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, तांत्रिक सल्लागार मोहम्मद इस्राईल, उपविभागीय अभियंता मोहम्मद शफीक, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. (महाराष्ट्र कार्यालय)चे महाप्रबंधक राजेश जाधव, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.चे (महाराष्ट्र कार्यालय)च्या संस्थागत व्यापर विपनन विभागाचे उपमहाप्रबंधक सी.एम. घोडपागे, उपमहाप्रबंधक नितीन रोडगे, मुख्य क्षेत्र व्यवस्थापक अनिल मेहर आदी उपस्थित होते.

Advertisement

शहरातील तलावांच्या स्वच्छता आणि सौंदर्यीकरणासाठी ‘रिमोट कंट्रोल फ्लोटिंग बोट’साठी नागपूर महानगरपालिकेतर्फे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मुंबई यांना सीएसआर निधीमधून पाच फ्लोटर बोटची विनंती करण्यात आली होती. यावर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.ने एक ‘फ्लोटर बोट’ निविदेद्वारे खरेदी करण्याकरीता मनपाला दोन टप्प्यात २९ लाख रुपये देण्याचे मंजूर केले होते. यासंबंधी गुरुवारी मनपा व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

तलावामधील प्लास्टिक, झाडांची पाने यासारखा अन्य कचरा ‘फ्लोटिंग बोट’द्वारे ३०० किलोग्रॅमपर्यंत एकाचवेळी काढला जाणार आहे. विशेष म्हणजे तलावाच्या काठावरूनच रिमोटने ही बोट संचालित केली जाईल.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement