Published On : Thu, Sep 12th, 2019

‘इनोव्हेशन पर्व’मधील संकल्पनांना जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न : महापौर नंदा जिचकार

दोन हजारांवर संकल्पनांपैकी २०० संकल्पनांची पुढील फेरीकरिता निवड आणि सत्कार

नागपूर : कुठल्याही गोष्टीला विचार प्रक्रिया आवश्यक असते. या विचारप्रक्रियेतूनच नवनव्या संकल्पना मांडल्या जातात. या संकल्पनांना व्यक्त होण्यासाठी, इनोव्हेशन म्हणून त्याचे व्यवसायात रुपांतर करण्यासाठी ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेने विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या इनोव्हेशन पर्व दरम्यान घेतलेल्या ‘द हॅकॉथॉन 2.O’ च्या माध्यमातून आलेल्या निवडक संकल्पनांना जागतिक पातळीवर नेण्याचा आपला प्रयत्न आहे. किमान एकाने जरी जगपातळीवर नाव कमावले म्हणजे या उपक्रमाचा उद्देश साध्य होईल, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

Advertisement

नागपूर महानगरपालिका, मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’मध्ये विद्यार्थ्यांनी मांडलेल्या संकल्पनातून २०० संकल्पनांची पुढच्या स्तराकरिता निवड करण्यात आली. या २०० संकल्पनांना पुरस्कृत करण्यासाठी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘द हॅकाथॉन 2.O-नेक्स्ट स्टेप : इनक्युबेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. मंचावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, निरीचे संचालक राकेशकुमार, मनपाचे आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, मनापचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, माजी आमदार तथा माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे संयोजक डॉ. प्रशांत कडू, मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या सदस्या डा संध्या दाभे, झुलेलाल इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालक श्रीमती माधवी वैरागडे, भगवती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन चौधरी, जे. एल. चतुर्वेदी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय शेंडे, के.डी.के. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.पी. सिंग, अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. अली, इनोव्हेशन पर्वचे समन्वयक केतन मोहितकर उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, विद्यार्थ्यांची ऊर्जा सकारात्मक दिशेने जायला हवी. ज्या संकल्पना आपल्या डोक्यात येतात, त्या सत्यात उतरविण्याच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवे. शासनसुद्धा अशा संकल्पनांना प्रोत्साहन देते. जे आहे त्यात समाधान मानण्यापेक्षा नवे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यासाठी आपली मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या दिवशी मानसिकता बदलेल त्यावेळी अनेक नव्या संकल्पनांचा जन्म होईल, असेही त्या म्हणाल्या. इनोव्हेनशन पर्वच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्राबाबत माहिती व्हावी, यादृष्टीने एक वेबसाईट तयार करण्यात येईल, अशी माहितीही महापौर नंदा जिचकार यांनी दिली.

याप्रसंगी बोलताना कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे म्हणाले, संकल्पना कुठल्याही वयात जन्माला येऊ शकते. महाविद्यालयीन जीवनात वेगाने संकल्पना जन्माला येतात. मात्र त्याला व्यासपीठ मिळत नाही. इनोव्हेशन पर्वच्या निमित्ताने हे व्यासपीठ आता उपलब्ध झाले आहे. गरज ही नव्या संकल्पनेची जननी आहे. संशोधन आणि इनोव्हेशन हे एकमेकांना पूरक आहेत. एखादे संशोधन आधीच झालेले असेल, त्याला जोडून नवे काहीतरी होत असेल तर ते इनोव्हेशन, असे सांगत त्यांनी याबाबतची अनेक उदाहरणे दिलीत. आपण मांडलेल्या संकल्पनांना व्यावसायिकरित्या कसे समोर आणता येईल, यासाठी इनोव्हेशन पर्वची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे इनोव्हेशनमधून रोजगार मिळविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करायला हवा, असेही ते म्हणाले.

निरीचे संचालक राकेशकुमार यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इनोव्हेशन पर्वच्या निमित्ताने आलेल्या संकल्पनांना वैज्ञानिकदृष्ट्या जी मदत हवी आहे, ती करण्यासाठी निरी सदैव तत्पर असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार मोहन मते म्हणाले, नवसंकल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी पुढाकार घेणारी नागपूर महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या जडणघडणीत खारीचा वाटा उचलावा, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकातून मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे संयोजक डॉ. प्रशांत कडू यांनी ‘इनोव्हेशन पर्व’ची संकल्पना, उपक्रमाची यशस्वीता याबद्दलची माहिती दिली. इनोव्हेशन पर्व अंतर्गत हॅकॉथॉनच्या माध्यमातून नऊ थीमअंतर्गत २३७० नवसंकल्पनांची विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ७६३ संकल्पनांचे सादरीकरण झाले. त्यातील ‘टॉप २००’ संकल्पनांची दुसऱ्या फेरीमध्ये निवड करण्यात आली आहे. या संकल्पनांना मार्गदर्शन करण्यात येईल. उद्योगात त्याला परावर्तीत

Advertisement
Advertisement
Advertisement