नागपूर : रामटेक ते भंडारा रोडवरील खंडाळा गावाजवळ भरधाव कार ट्रकला धडकून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात आतापर्यंत ३ जण ठार झाले असून ६ जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. हे सर्व अपघातग्रस्त एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात रविवारी दुपारी ३ वाजता झाला.अपघातातील जखमींवर रामटेक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परसराम लहानू भेंडारकर (वय ७० वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर चालक राजेश परसराम भेंडारकर (वय ३४ वर्ष), दुर्गा राजेश भेंडारकर (वय ३२ वर्ष), मेघा चद्रहास बोंदरे (वय ३१ वर्ष), सिताबाई परसराम भेंडारकर (वय ८३ वर्ष), व लहान मुले हिमांशू राजेश भेंडारकर (वय ८ महिने), ऊन्नती राजेश भेंडारकर( वय ५ वर्ष), भार्गवी चद्रहास बोंदरे (वय ८ वर्ष), भाव्या चद्रहास बोंदरे (वय ८ वर्ष) सर्व राहणार सोनकापाळसगाव. ता. साकोली जि भंडारा. अशी जखमींची नावे आहेत.भेंडारकर आणि बोंदरे कुटुंब रविवारी रामटेक येथे देवदर्शनाला जात असल्याची माहिती समोर येत आहे.