Published On : Tue, Aug 18th, 2020

वाडी परिसरातील कोरोना प्रसार थांबविण्यासाठी तहसील कार्यालयात अधिकारी-प्रतिष्ठित नागरिकांची सभा सम्पन्न

अधिकारी,वाडी चे माजी लोकप्रतिनधी,पत्रकार यांचे उपायांवर मंथन!

वाडी परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असून संख्या 150 च्या पलीकडे गेली आहे.

भविष्यात ही स्थिती नियंत्रणांबाहेर जाऊन विदारक चित्र निर्माण होऊ नये हे लक्षात घेता तहसील प्रशासन,वाडी नगरपरिषद प्रशासन यांच्या संयुक्त नियोजनातून सोमवारी दुपारी नागपूर तहसील ग्रामीण कार्यालय येथे अधिकारी,वाडीतील माजी नगरसेवक,पदाधिकारी,राजकीय पदाधिकारी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांची एक संयुक्त सभा सम्पन्न झाली.उपविभागीय अधिकारी अशोक ब्रिजवाल,तहसीलदार मोहन टिकले,वाडी न.प. चे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी संयुक्त पणे बैठकीचे गरज,उद्देश महत्व उपस्थितांना समजावून सांगून करोना चा प्रसार प्रतिबन्ध करण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले.


बैठकीला उपस्थित वाडीतील प्रतिष्ठित नागरिक-यांनीही चर्चते सहभाग घेऊन या नियोजना ला होकार देऊन काही मुद्दे उपाय देखील बैठकीत सुचविले.या सभेत वाडी नप चे व व्याहाड व नागपूर आरोग्य विभागाचे अधिकारी , कर्मचारी सुध्दा उपस्थित होते .