Published On : Thu, Aug 1st, 2019

कामठीत सेवादल काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

सेवादल काँग्रेस कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या नागरिकांच्या समस्या सोडवून काँग्रेस पक्ष अधिक बळकट करावे :- आबीद भाई ताजी

कामठी :-, सेवादल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या नागरिकांच्या समस्या सोडवून काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे आव्हान नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव आबीद भाई ताजी यांनी कामठी येथील नगर काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित सेवादल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले

सेवादल काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव आबीड भाई ताजी यांचे हस्ते ध्वजारोहण व सेवादल काँग्रेसचे संस्थापक नारायण सुब्बाराव हर्डीकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले

यावेळी नागपूर जिल्हा सेवादल काँग्रेस अध्यक्ष तुळशीराम कालमेघ, नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा यादव ,राजकुमार गेडाम ,किशोर धांडे ,अब्दुल सलाम अन्सारी ,प्रकाश लाईन पांडे ,वसंतराव घाडगे ,अनिल खोब्रागडे ,सुनील कुर्वे ,विष्णू चनोले ,माजी नगराध्यक्ष अंकुश बावनकुळे उपस्थित होते कार्यक्रमात सर्व पाहुण्यांनी मार्गदर्शन करून काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामठी तालुका सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष किशोर धांडे, यांनी केले संचालन राजकुमार गेडाम यांनी केले व आभार प्रदर्शन कृष्णा यादव यांनी मानले मेळाव्याला मोठ्या संख्येने सेवादल काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी