Published On : Fri, Jun 12th, 2020

कोरोनाशी लढण्यासाठी OCWचे ‘पीएम केअर्स फंड’ला १५ लाखांचे योगदान

Advertisement

नागपूर: ऑरेंज सिटी वॉटर (OCW) च्या कर्मचाऱ्यांनी ‘पीएम केअर्स फंड’ला नोवल कोरोना वायरसच्या महामारीशी लढण्याच्या उद्देशाने रु.१५लाखांचे योगदान दिले आहे.

OCW कर्मचाऱ्यांच्यावतीने, OCWचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजोय रॉय यांनी रु.१५लाखाचा धनादेश जिल्हाधिकारी श्री रवींद्र ठाकरे यांच्या सुपूर्त केला. यावेळी OCWचे निदेशक श्री केएमपी सिंह देखील उपस्थित होते.

नागपूर शहरात २४x७ योजनेची अमलबजावणी करणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटरचे सर्व कर्मचारी कोरोना साथीच्या कठीण काळातदेखील नागपूरकरांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी तसेच पाणीपुरवठ्याविषयीच्या कुठल्याही तक्रारींच्या निराकरणासाठी पूर्णपणे कार्यरत आहेत. OCWच्या कामगारांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व जण सर्व सुरक्षा उपाययोजनांचे पालन करत आहेत. यामध्ये व्हॉल्वमेन, प्लंबर्स, सुपरवायझर, इंजिनिअर्स, टँकर व्यवस्थापन चमू, जलशुद्धीकरण केंद्र येथील कर्मचारी, ग्राहक सेवा चमू, महिला तसेच पुरुष कर्मचारी या सर्वांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारीगण पौरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी सतत झटत आहेत.

यावेळी बोलताना OCWचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय यांनी नागपूरकरांना आवाहन केले आहे कि, “तुम्हाला स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्याचप्रकारे आपल्या शहराला तसेच देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही आपल्या कुटुंबासमवेत घरात रहा.”