कन्हान : – सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे पारंपरिक भव्य कलश व कावड यात्राने कन्हान नदीचे पावन जल आणुन नवदुर्गा मंदीरात महादेवीचे जलाभिषेक करुन घटस्थापना सह नवरात्र महोत्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे.
रविवार दिनांक २९/०९/२०१९ ला सकाळी १० वाजता बीकेसीपी शाळेच्या जवळील कन्हान नदीचे पुजन करून २०१ कलशा मध्ये पावन जल घेऊन कलशधारी नवकन्या, महिला व कावड धारी पुरूष भाविक भक्तासह मातेचे नवरूप असलेल्या घोडागाडी, महिला व पुरूष भजन मंडळी मातेच्या जयघोषात भव्य कलश, कावड पदयात्रा पारंपरिक पध्दतीने महामार्गानी नगरपरिषद चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक, धरम नगर मार्गे पिपरी येथील नवदुर्गा मंदीरात दुपारी २ वाजता पोहचुन नवदुर्गा मातेचे कन्हान नदीच्या पावन कलशाने मान्यव रांच्या हस्ते जलाभिषेक, विधीवत पुजा अर्चनासह आरती करून सार्वजनिक नवदुर्गा महोत्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे. नऊ दिवस सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात येईल.
शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर ला ७.३० वाजता इंडियन आयडल फेम, सिने गायक सोनु निगम सोबत गायन करणारे सह गायक अभिजीत कडु यांचा भव्य दिव्य लोककलेचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सोमवार दि ७ ऑक्टोबर ला सायंकाळी ५ वाजतापासु न महाप्रसाद वितरण दि.८ ऑक्टोबर ला सकाळी १० वाजता पिपरी च्या कन्हान नदीत घट विसर्जन करून सायंकाळी ७ वाजता दुर्गा माता चौक पिपरी येथे रावन दहन करून नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात येईल.
सार्वजनिक नवरात्र महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमात परिसरातील भाविक भक्तांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहुन मातेचा आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. महोत्सवा च्या यशस्वीते करिता सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी च्या वतीने माजी खासदार श्री. प्रकाशभाऊ जाधव, केशरीचंद खंगारे, राधेशाम भोयर, प्रशांत बाजीराव मसार, भोला भोयर, संजय चतुर, गुड्डू यादव, राजु कुर्वे, गौरव भोयर, अजाबराव कडनायके, प्रकाश डांगे, दिपक तिवाडे, प्रताप तिलीखेडे, कुंदन रामगुंडे, आकाश खडसे, आकाश भगत, अमोल भोयर, सचिन खंगारे, हर्षल तिवाडे, रवि यादव, गोपाल मसार, दिनेश ठाकरे, विनोद येलमुले, संदीप भोस्कर, पकंज खंगारे, विक्रम तिवाडे, बंटी ढोले, पकंज हांडे, उज्वल येलमुले, साहील चौधरी, कुणाल आगुटलेवार सहीत परिसरातील भाविक मंडळी परिश्रम घेत आहेत.









