नागपूर : हुडकेश्वर परिसरातील १७ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने वेगाने तपास सुरू करून मुलाला सुखरूप शोधून काढले आहे.
३० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजता हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा फिर्यादी यांचा अल्पवयीन मुलगा घरातून कोणाला काहीही न सांगता बाहेर गेला होता. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही तो मिळून न आल्याने फिर्यादीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. यावरून अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, १ सप्टेंबर रोजी गुन्हेशाखा व मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, वैष्णवी माता नगर परिसरात एक अल्पवयीन मुलगा फिरत आहे. त्यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत शोधमोहीम राबवली. वर्णनाशी साधर्म्य असलेला मुलगा दिसताच त्याला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. चौकशी व समुपदेशनानंतर त्याला पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत गपोनि ललिता तोडारी, राफौ. गजेंद्रसिंग ठाकुर, पोहवा. श्याग अंगुलबेवार, राग. निरगुडबार, पोअं. विलास चिंचुलकर, दिपक गिते, नयोअं. अश्विनी खोडपेवार व वैशाली किनीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ही कामगिरी वेगवान तपास आणि तातडीच्या कारवाईचे उत्तम उदाहरण ठरली आहे