Published On : Tue, Sep 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नंदनवन पोलिसांची कामगिरी; घरफोडी उघडकीस, ११.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर : नंदनवन पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा थरारक तपास करून अवघ्या काही दिवसांत गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी तब्बल रु. ११ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ ते १० वाजताच्या सुमारास नंदनवन परिसरातील हिरवी लेआउटमध्ये ही घरफोडी झाली होती. फिर्यादी राहुल अशोक कुहीकर (३३, रा. हिरवी लेआउट, नागपूर) हे गणेशोत्सव पाहण्यासाठी परिवारासह बाहेर गेले असता चोरट्यांनी संधी साधली. अज्ञात आरोपींनी घराचे कुलूप तोडून बेडरूममधील आलमारीतील रोख २० हजार रुपये, ११४ ग्रॅम सोन्याचे दागिने व ७० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ११.७० लाखांचा ऐवज लंपास केला.

या घटनेवरून नंदनवन पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास करून खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपींना निष्पन्न केले.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटक आरोपी :
१) सुजीत धनपाल बोरकर (१९, रा. सुरज नगर, वाठोडा, नागपूर)
२) रोहित बीनीराम नागोसे (२२, नागपूर)
३) त्यांचा एक विधी संघर्षग्रस्त साथीदार

आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर आयुक्त शिवाजीराव राठोड, उपायुक्त रश्मिता राव व सहआयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीत वपोनि विनायक कोळी, दुपोनि जसवंत पाटील, पोउपनि प्रदीप काईट, पोहवा आशिष तितरमारे, सोमेश्वर घुगल, संजय वरवारडे, प्रदीप भदाडे, संजय मुकादम व पोअं. हिमांशु पाटील यांचा समावेश आहे.पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement