Published On : Thu, Feb 4th, 2021

७ फेब्रुवारीला सावनेर शहरात होणार भव्य रोजगार मेळावा

Advertisement

सावनेर– महाराष्ट्र सरकारचे पशुसंर्वधन,दुग्धव्यासाय ,विकास मंत्री सुनील बाबासाहेब केदार यांच्या प्रमुख उपस्थित होणार भव्य रोजगार मेळावा . सावनेर व कलमेश्वर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक -युवतींसाठी रोजगारची सुवर्णसंधी . नोकरी अथवा व्यवसाय सुरू करण्याच्या संधी सर्वजण शोधत असतात अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वा. GOVT. ITI कॉलेज,सावनेरला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेक छोटे उद्योग धंदे देखील बंद पडले आहेत. आधीच बेरोजगारी आणि त्यामध्ये कोरोनामुळे आलेल्या संकटानं वाढलेला ताण. अशा परिस्थितीत नोकरी अथवा व्यवसाय सुरू करण्याच्या संधी सर्वजण शोधत असतात अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

येत्या ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सावनेर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून तिथे आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार असून १०वी,१२वी,ITI उत्तीर्ण ते सर्व शाखाच्या तसेच पदवी / पदवीधारक उमेदवारांच्या तेथेच मुलाकात घेऊन त्यांना रोजगाररांची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे .

या मेळाव्यात साधारण हजारों युवक-युवतियांना भरपूर रोजगार भरणार असल्याची माहिती मिळाली आहे. इच्छुक युवक युवतींनी या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून लाभ घेऊ सकतात .

अधिक माहितीसाठी यांना संपर्क करा.

Advertisement
Advertisement