Published On : Fri, Jun 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

शिंदे गटाच्या नगरसेवकावर अत्याचाराचा गुन्हा; विवाहितेचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Advertisement

नवी मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे ऐरोली येथील स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले यांच्याविरोधात 26 वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने वारंवार अत्याचार, नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी आणि मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे नवी मुंबईसह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, जुलै 2024 मध्ये पीडिता आपल्या काकांना भेटण्यासाठी ऐरोलीतील चौगुले यांच्या अपार्टमेंटमध्ये गेली होती. त्यावेळी काका परत येईपर्यंत थांबण्यास सांगून चौगुले यांनी तिला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, अत्याचारानंतर तिचे नग्न फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार छळ केल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पीडितेने फोटो हटविण्याची विनंती केल्यानंतर चौगुले यांनी नकार दिला आणि तिचा संपर्क तोडल्याचा आरोप आहे. त्यानंतर अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधल्यावरही तिला शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अखेर 1 जून रोजी ठाकरे गटाच्या एका नेत्याच्या मदतीने तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, साहिल चौगुले यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हा विरोधकांनी रचलेला राजकीय कट असल्याचा दावा केला आहे. संबंधित महिला खोट्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी करून लोकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसांना ऑडिओ क्लिपही दिल्याचे चौगुले यांनी सांगितले.

Advertisement

रबाळे पोलिसांनी साहिल चौगुले आणि त्यांचा सहकारी अमित मौर्य यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.