Published On : Mon, Sep 9th, 2019

आसोलीच्या के जॉन पब्लिक स्कुल विरोधात मौदा पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल

Advertisement

कामठी : -6 सप्टेंबर महालक्ष्मी पूजन पर्वनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती तसे विभागीय आयुक्ताचे आदेश सुद्धा जाहीर होते मात्र कामठी तालुक्यातील आसोली गावातील के जॉन पब्लिक स्कुल चे व्यवस्थापक मंडळाने विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शासकीय सुट्टी असूनही शाळा सुरु ठेवली व काल झालेल्या मुसळधार पावसाने झालेल्या अतिवृष्टीत शाळेसमोरील मुख्य मार्गावर झालेल्या पावसाच्या पाण्याचा पुरसदृश्य वेढा असल्याने स्कुल बस पोहोचणे शक्य होत नव्हते तसेच विद्यार्थ्यांनाही या पाण्यातुन जीव ओलांडणे हे धोक्याचे असल्याने शाळेतील विद्यार्थी शाळेतच अडकले होते.

तर हे विद्यार्थी बराच वेळ ताटकळत घरी जाण्याच्या प्रतीक्षेत होते तर इकडे बराच वेळा होऊनही विद्यार्थी नियोजित वेळेवर घरी न पोहोचल्याने चिंतीत पालकांनी संपर्क साधला असता सदर परिस्थिती निदर्शनास येताच पालकांनी केलेल्या प्रयत्नातून तसेच स्थानिक नागरिकाणी दाखविलेल्या माणुसकीच्या धर्मातून मानवी साखळी तयार करीत विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन बाहेर काढले तसेच वेळीच पोहोचलेल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या यशस्वी प्रयत्नामुळे विद्यार्थी सुखरूप शाळेबाहेर आल्याने चिंताग्रस्त पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली.ही घटना क 6 सप्टेंबर ला सायंकाळी 5 दरम्यान निदर्शनास आली होती

यानुसार शाळेतील जवळपास 2300 विद्यार्थी रात्री 9 वाजेपर्यंत शाळेत च अडकले असल्याचे सांगण्यात येते हा सगळा प्रकार के जॉन पब्लिक स्कुल च्या व्यवस्थापनाच्या हलगर्जी पणामुळे झाला असून या बेजबाबदार वृत्ती मुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरलेल्या शाळेच्या व्यवस्थापनाला कामठी पंचयात समिती चे गटशिक्षण अधिकारी कश्यप सावरकर यांनी 7 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजेपर्यंत कारणे दाखवा नोटीस अंतर्गत खुलासा सादर करण्याचे दर्शविले होते मात्र मुदतीची वेळ देऊनही के जॉन पब्लिक स्कुल चे व्यवस्थापक न पोहोचल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे तसेच शाळेच्या व्यवस्थापकाने जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याने भादवी कलम 188 अनव्ये कारवाही करीत शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस शिक्षण अधिकारी कडे केले असून यावर जी प शिक्षण अधिकारी (माध्यमिक)चे डॉ एस एन पटवे ने दिलेल्या आदेशान्वये आज कामठी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कश्यप सावरकर यांनी के जॉन शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापक विरुद्ध मौदा पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार आसोली येथिल के जॉन पब्लिक स्कुल मध्ये नर्सरी ते 10 वि पर्यंत चे विद्यार्थी शिक्षण घेत असून 6 सप्टेंबर ला महालक्ष्मी पूजन ची शासकीय सुट्टी असूनही शाळा सुरू असल्याने दौनंदिनरित्या शालेय विद्यार्थी नियोजित वेळेवर सकाळी पोहोचले दरम्यान सकाळी साडे अकरा नंतर झालेल्या मुसळ धार पावसमुळे अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाल्याने परिसरात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली तसेच या शाळेसमोरील मुख्य मार्ग तसेच सभोवतालचा परिसर हा पुरसदृश्य पाण्याने वेढुन गेल्याने या मार्गाने शाळेत नियमित जाणारे शालेय वाहने पोहोचणे शक्य होत नव्हते तर शाळेच्या व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांना शाळेतच सुरक्षित थांबवले होते तर दुसरीकडे बराच वेळ होऊनही नियोजित वेळेवर पोहोचणारे विद्यार्थी घरी न परतल्याने पालकांनी शाळेसमोरील या पुरसदृश्य पाण्यासमोर एकच गर्दी केली ही वार्ता हवेसारखी पोहोचताच त्या आसोली गावातील स्थानिक नागरिक, पालक वर्ग तसेच स्थानिक प्रशासनाने केलेल्या प्रयत्नातून गावकरी मंडळी नि मानवी साखळी तयार करीत शाळेतील तबबल 2300 विद्यार्थ्यांना या पुरसदृश्य पाण्याबाहेर सुखरूप काढले यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी कश्यप सावरकर , मौदा चे पोलिस निरीक्षक यांनी विशेष उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश गाठले मात्र शाळेच्या हलगर्जीपणा वृत्तीमुळे शासकीय सुट्टी असूनही शाळा सुरू ठेवणे , झालेल्या अतिवृष्टी ची संभावना असतानाही विद्यार्थ्यांना तात्काळ सुरक्षित हलवून घरी पाठविण्यात आले नाही

त्यामुळे या शाळेच्या व्यवस्थापकावर भादवी कलम 188 अनव्ये कारवाही करीत शाळेची मान्यता रद्द का करू नये याबाबत खुलासा मागण्यात आले होते मात्र काल दुपारची 3 वाजेची वेळ मुदत निघूनही गेली मात्र शाळेच्या व्यवस्थापका कडून खुलासा सादर न केल्याने गटशिक्षणाधिकारी ने केलेल्या पाठपुराव्याने . शिक्षणाधिकारी (माध्यमिक)ने दिलेल्या आदेशानव्ये के जॉन शाळेचे मुख्याध्यापक तसेच शाळेचे व्यवस्थापक विरुद्ध मौदा पोलीस स्टेशन ला आज तक्रार दाखल करण्यात आली आहे तेव्हा या के जॉन शाळे विरुद्ध गुन्हा दखल होऊन शाळेची मान्यता रद्द होणार का?याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.