Published On : Tue, Jun 16th, 2020

घरकुल योजनेला गती देण्याच्या मागणीसह कांग्रेस चे जिल्हाधिकारी ला सामूहिक निवेदन सादर

घरकुल योजनेसाठी केंद्र शासनाने तात्काळ निधी वर्ग करण्यात यावे-माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

कामठी :-‘रोटी कपडा और मकान’या त्रिसूत्री कार्यक्रमातील अत्यंत महत्वाचा समजल्या जाणारा भाग म्हणजे निवारा. तेव्हा बेघर असलेल्या नागरिकांसाठी कामठी नगर परिषद च्या वतीने शासकीय योजनेच्या माध्यमातून इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना तसेच शबरी योजनेच्या लाभातून योग्य त्या लाभार्थ्यांना निवासाची सोय करून दिली त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांपूर्तीनिमित्त सन 2022 पर्यंत सर्वांना घरे या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना 2015 मध्ये सुरू केल्यानुसार कामठी नगर परिषद च्या वतीने 10 एप्रिल 2017 पासून पंतप्रधान आवास योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली.या योजनेअंतर्गत 5 हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे .

यानुसार अर्जाची केलेल्या छाननीवरून भाडेकरू, नझुल व आखिवपत्रिका धारक अश्या तीन घटकांचे डीपीआर तयार करून 1077 अर्ज मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते ज्यामध्ये 688 नझुल धारक, 389 अखिवपत्रिका धारक लाभार्थ्यांचा समावेश आहे .यातील 688 नझुल धारक लाभर्थयापैकी 355 लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम सुरू आहे या 355 घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून आलेला निधी प्राप्त झाला मात्र केंद्र शासनाकडून येणारा निधी लाभार्थ्यांना प्राप्त न झाल्यामुळे छत पातळी पर्यंत बांधकाम झालेल्या या घरकुल लाभार्थ्यांना भर पावसात उघड्यावर निवारा करण्याची वेळ आली आहे तेव्हा या घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेत घरकुल साठी केंद्र शासनाकडून येणारा निधी , हफ्ता वा हिस्सा नगर परिषद हद्दीतील घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

याप्रसंगी नगरसेवक काशीनाथ प्रधान, नगरसेवक नीरज लोणारे, कांग्रेस चे पदाधिकारी इरशाद शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कामठी शहर हे अजूनही अविकसित असून येथे मोठ्या प्रमाणात दारिद्र्यरेषेखालील कुटुंब मोठ्या प्रमाणात आहेत तसेच मागासवर्गीय, निरक्षर, निराधार या कुटुंबियांना अजूनही पक्का निवारा नाही कित्येक अनियमित झोपडपट्टीत जीवन वास्तव्य करीत आहेत तसेच एक पिढी लोटूनही

या झोपडपट्टीत राहनाऱ्या आम आदमीच्या वाट्याला अजूनही उपेक्षाच राहिल्याने कित्येक झोपडपट्ट्या ह्या नियमित होण्याच्या प्रतीक्षेत असून तळहातावरचे जिणं जगत आहेत.तेव्हा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर व 24 तास पाण्याची सोय मिळणार या हेतूने कित्येक लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत घरकुल साठी अर्ज केले आहेत मात्र केंद्र शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षित पणा मुळे या गरिबांच्या घराचे घरकुल चे स्वप्न भंग होण्याच्या स्थितीत आहेत,.तेव्हा या लाभार्थ्याना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र शासनाकडून येणारा घरकुल निधी त्वरित लाभार्थ्यांना वळती करावे अशी मागणी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले आहे

संदीप कांबळे कामठी