Published On : Tue, Jun 16th, 2020

राज्यपालांनी घेतली रश्मी ठाकरे यांची सांत्वनापर भेट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची कलानगर वांद्रे येथे सांत्वनापर भेट घेतली.

रश्मी ठाकरे यांचे वडील माधवराव पाटणकर यांचे काल निधन झाले. या निमित्त राज्यपालांनी ही भेट घेतली. यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व स्वाती सरदेसाई देखील उपस्थित होते.