Published On : Thu, Mar 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या रामदास पेठेत उभी कार अचानक पेटली; अग्निशमन दलाची तत्परता, मोठा अनर्थ टळला!

Advertisement

नागपूर : शहरातील रामदास पेठ परिसरातील अक्षय अपार्टमेंटजवळ उभी असलेल्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सिव्हिल अग्निशमन केंद्राला पहाटे २.४१ वाजता घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली.

अग्निशमन दलाचे कर्मचारी अवघ्या काही मिनिटांत म्हणजेच २.४५ वाजता घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पाण्याच्या फवाऱ्यांच्या सहाय्याने कारमधील आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय अपार्टमेंट परिसरात राहणाऱ्या सुषमा पनकुले यांच्या मालकीची महिंद्रा कंपनीची चारचाकी कार (मॉडेल २०१९) उभी असताना या वाहनाला आग लागली. या आगीत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Gold Rate
Apr 22 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,700 /-
Silver/Kg ₹ 2,51,000/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. प्राथमिक माहितीनुसार वाहनातील विद्युत बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेची नोंद सीताबर्डी स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement