Published On : Tue, Nov 12th, 2019

कठाळकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिरचे आयोजन

कन्हान:- आज दिनांक 11 नोव्हेबर 2019 ला श्री साईं प्रसाद कॉलेज ऑफ आर्ट्स . येथे राष्ट्रीय.सेवा.योजना( NSS) च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.विद्यार्याच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्या ने प्रतिशात लाभला .एकूण 43 विद्यार्थी रक्तदान केले .

कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी श्री व्यंकटराव कारेमोरे (माजी जि. प सदस्य) तर मार्गदर्शक साई नाथ ब्लड बँक यांचे संचालक डॉ.खंडेलवाल सर होते तसेच प्रमुख पाहुणे श्री साईं सेवा शिक्षण मंडळा चे अध्यक्ष श्री अमोलजी गारुड़ी तर संस्था सचिव श्री विजयराव कठाळकर तसेच श्री आर .आर.मोटघरे मुख्याध्यापक ग्रामीण विकास विद्यालय सालवा यांनी सुद्धा विद्यार्थयाना मार्गदर्शन केले.

तसेच सौ सुष्मिता कठाळकर ,सौ सारिका गारुड़ी ,कु.राजलक्ष्मी गारुड़ी प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालय च्या कार्यकारी प्राचार्या डॉ.सुप्रिया पेंढारी यांनी केले तर संचालन रा.से.यो अधिकारी डॉ. गोरे सर यांनी केले आभार प्रदर्शन कु.ठाकरे मैडम यांनी मानले .तसेच सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.