Published On : Tue, Nov 12th, 2019

अडारी नायडू UPSC परीक्षेत 69 व्या क्रमांकाने उत्तीर्ण

कामठी चे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केला गौरव

कामठी :-कामठी तालुक्यातील भिलगाव रहिवासी संचय अडारी एबी नायडू याने इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ( UPSC) परीक्षेत देशातून 69 वा स्थान प्राप्त केल्या बद्दल कामठी तहसील कार्यालयात तहसिलदार अरविंद हिंगे यांच्या शुभ हस्ते गौरव करण्यात आला.

भीलगाव येथील संचय अडारी नायडू यांनी इंडियन इंजीनियरिंग सर्विस परीक्षेत देशातून 69 वा स्थान प्राप्त केल्याबद्दल तहसील कार्यालयात कामठी चे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी संचय अडारी नायडू व त्याच्या आई-वडिलांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला यावेळी नायब तहसीलदार रंणजित दुसावार, भिलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मभाऊ काळे, लतेश्वरी काळे प्रामुख्याने उपस्थित होते

याप्रसंगी प्रस्तुत प्रतिनिधीने संचय आडारी नायडू यांची मुलाखत घेतली असता त्यांनी सांगितले की सेंट जॉन हायस्कूल गड्डीगोदाम नागपूर येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले , संताजी कनिष्ठ महाविद्यालय वर्धा रोड नागपूर येथून बारावी विज्ञान शाखेतून परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर काटोल मार्गावरील रामदेवबाबा इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त प्रथम श्रेणीत प्राप्त केली त्यानंतर त्यांनी आयआयटी रुडकी येठुन एमटेक ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली नुकतेच वर्षभरापूर्वी त्याने नागपूर मेट्रो येथे इंजीनियरिंग अभियांत्रिकी अधिकारी म्हणून नोकरी रुजू केली होती काही दिवसापूर्वी संचय ने इंडियन अभियांत्रिकी सर्व्हिसेस ची परीक्षा दिली होती त्या परीक्षेत देशातून 69 वा स्थान प्राप्त करून भिलगाव व कामठी तालुक्याचा नाव भारत देश्याच्या प्रविण्या सूचित झळकवल्याबद्दल कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

संचय यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, व गुरु याना देत असल्याचे व्यक्त केले .सत्काराप्रसंगी मार्गदर्शन करताना तहसीलदार अरविंद हिंगे म्हणाले की ,ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने कठोर परिश्रम केले तर नक्कीच यश प्राप्त होते तेव्हा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक नायब तहसीलदार रणजीत दुसावार यांनी केले. संचालन अमोल पोळ यांनी केले व आभार प्रदर्शन शेख शरीफ यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी