Published On : Sat, Feb 6th, 2021

उत्तर नागपुरात ११०० कोटी रुपयांचे ७०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा

उत्तर नागपुरात विविध कामांचे डॉ. राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर – उत्तर नागपूरमध्ये ७०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल लवकरच उभारले जाणार असल्याची घोषणा राज्याचे उर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केली.

डॉ. राऊत यांच्या हस्ते आज उत्तर नागपुरात विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. या विकास कामांवर १ कोटी १२ लाख रुपये खर्च होणार आहेत. यावेळी ते बोलत होते. मौजा वांजरी येथील हमीदनगरात मुस्लिम कब्रस्तान येथे सिमेंट रस्त्याचे (२०.१७ लाख) भूमिपूजन, मौज बिनाकीतील इंदिरानगरात संरक्षण भिंतीचे (१५.४० लाख) बांधकाम, मौजा बिनाकी येथील सिमेंट रस्त्याचे बांधकाम (१०.७८ लाख), मौजा नारी येथील मानवनगरात सुरेश पाटील व वर्षा शामकुळे यांच्या घरासमोर सिमेंटचा रस्ता (४८.४१ लाख) व मौजा इंदोरा येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोरील नागपूर स्लम को-आप. हाऊसिंग सोसायटीत समाज भवनाच्या (१८.०७ लाख) भूमिपूजन डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते आज झाले.

यावेळी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, उत्तर नागपूरमध्ये अत्याधुनिक सोयींनी युक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल बांधले जाणार आहे. यामुळे चांगल्या आरोग्य सुविधांसाठी उत्तर नागपुरातील लोकांना आता मेडीकल अवलंबून राहावे लागणार नाही. एवढेच नव्हे तर या हॉस्पीटलमध्ये एमबीबीएस व एमडीनंतर करावयाचे २६ अभ्यासक्रम सुद्धा सुरू केले जाणार आहे. चंदीगड येथील आल इंडीया मेडीकल सायंसेसच्या धर्तीवर हे हॉस्पीटल राहणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

यावेळी उत्तर नागपूर येथील ब्लॉक १३ चे अध्यक्ष सुरेश पाटील, नगरसेविका नेहा निकोसे, नगरसेवक दिनेश यादव, नागपूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष रत्नाकर जयपूरकर, काँग्रेस सेवादलचे राष्ट्रीय समन्वयक कृष्णकुमार पांडे, सुरेंद्र चव्हाण, नागपूर स्लम कोआप. हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष एन. टी. मेश्राम, दीपक खोब्रागडे, भंते शीलवंत, शैलेश राऊत, हरिभाऊ किरपाने, नगरसेवक परसराम मानवटकर, आसिफ शेख, सतीश पाली, विजया हजारे, गौतम अंबादे, साहेबराव सिरसाट, निलेश खोबरागडे, सन्तोष खडसे, तुषार नदागवळी, राकेश इखार, चेतन तरारे, मुलचद मेहर, विपुल महले, मंगेश सातपुते, मसूर खान, शहाबुद्दीन, शेख शहनवाज, रवि सातपुते, अलीम बफाती, इमरान खान, सलीम खान, सतीश चोकसे, राम यादव, बाबु खान,
इदपाल वाघमारे, रवि शेडे, जान जोसेफ आदी उपस्थित होते.