नागपूर – नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वानाडोंगरी येथील स्मशानभूमीजवळ शुक्रवारी सकाळी एका ३४ वर्षीय तरुणाचा बेशुद्धावस्थेत आढळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मृत व्यक्तीचे नाव नितेश नरेंद्र भोळे (वय ३४, रा. वॉर्ड क्रमांक ७, संगम खैरी, हिंगणा) असे असून, तो शुक्रवारी सकाळी स्मशानभूमीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने त्याला एआयआयएमएस रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नागपूर शहरात सध्या वाढलेल्या तापमानामुळे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, अधिकृत शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
या प्रकरणी नितेश याचा भाऊ उमेश नरेंद्र भोळे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.