Advertisement
नागपूर: शहरातील टेका नाका येथील हबीब नगर नाई वस्तीत नाल्याचा किनाऱ्यावर असलेली ३ मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची महिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सुदैवाने इमारतीत कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडतात. नागपुरात अनेक ठिकाणी नाल्याच्या बाजूला लोकांनी घरे बांधली आहेत. पावसाळ्यात अशा ठिकाणी घरे असणाऱ्या नागरिकांना धोक्याचा इशाराही देण्यात येतो. मात्र नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते. परिणामतः त्यांना अशा घटनांना तोंड द्यावे लागते.
Advertisement