Advertisement
नागपूर: मंगळवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत नागपूर जिल्ह्यातील ऊमठा गावात पानी फाउंडेशनच्या वतीने मराठी अभिनेता जितेंद्र जोशी आणि एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.
आज महाराष्ट्र दिनानिमित्त पाणी फाउंडेशन द्वारे महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे याअंतर्गत अभिनेता आमिर खान अभिनेत्री आलिया भट किरण राव पाणी फाउंडेशन चे सीईओ सत्यजित भटकळ अभिनेत्री सई ताम्हणकर असे अनेक प्रसिद्ध प्रसिद्ध चेहरे यानिमित्ताने महाराष्ट्राचा वेगवेगळ्या भागात श्रमदान करत आहेत.
महाश्रमदानाचा हा कार्यक्रम आज पाणी फाउंडेशनद्वारे राज्याच्या १००० गावांमध्ये राबवला जात आहे.
Advertisement