Published On : Thu, Jun 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या प्रजापती चौक उड्डाणपुलावर भीषण अपघात; कचरा संकलन वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Advertisement

नागपूर : शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. प्रजापती चौक उड्डाणपुलावर कचरा संकलन वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, कावरापेठ येथील प्रणय दिलीप बडगे आणि त्याचा मित्र आर्य धर्मेश राठोड हे बुधवारी रात्री मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी कुही येथील एका फार्महाऊसवर गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर गुरुवारी सकाळी दोघेही दुचाकीने नागपूरकडे परतत होते.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास प्रजापती चौक उड्डाणपुलावर समोरून येणाऱ्या घरगुती कचरा संकलन वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की प्रणय बडगे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आर्य राठोड गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमी आर्य यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी कचरा संकलन वाहनाचा चालक मनोज उईके याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मित्राच्या वाढदिवसाचा आनंद काही क्षणांतच शोकांतिकेत बदलल्याने बडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges