Published On : Wed, Jul 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विशाल मुत्तेमवार नियुक्ती; राज्य कार्यकारिणीची पक्षाची यादी अखेर जाहीर

Advertisement

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली असून, विशाल मुत्तेमवार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

या नव्या कार्यकारिणीत एकूण 36 जणांचा राजकीय व्यवहार समितीत, तर 16 वरिष्ठ उपाध्यक्ष, 38 उपाध्यक्ष, 5 वरिष्ठ प्रवक्ते, 108 सरचिटणीस, 95 सचिव आणि 87 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Gold Rate
04 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,300 /-
Gold 22 KT ₹ 93,300/-
Silver/Kg ₹ 1,12,100/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे नेतृत्वाची सूत्रे आल्यापासून जवळपास सहा महिन्यांनंतर ही यादी जाहीर झाली आहे. यामध्ये अनेक जुने आणि अनुभवी नेत्यांना संधी देण्यात आली असली तरी काही नवीन चेहऱ्यांनाही स्थान मिळालं आहे.

या यादीत रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पाटील यांचाही समावेश आहे. तसेच सतेज पाटील, वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, धीरज देशमुख, सचिन सावंत, अनंत गाडगीळ यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रवक्त्यांमध्ये अतुल लोंढे, गोपाळ तिवारी यांचाही समावेश असून, श्रीनिवास बिक्कड यांची पुन्हा एकदा माध्यम समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकट करण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Advertisement