Published On : Wed, May 23rd, 2018

डॉयरेक्ट टू होम सेवेद्वारे स्पीडपोस्टाने 91 हजार 568 प्रमाणपत्राचे वितरण – अश्विन मुदगल

Advertisement

Setu, Nagpur
नागपूर: सेतूकेंद्रामार्फत नागरिकांच्या सुविधेकरिता ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली असून सेतूकेंद्रामध्ये अर्ज सादर केल्यानंतर 7 दिवसाचे आत प्रमाणपत्र पोस्ट सेवेद्वारे थेट अर्जदारांना घरपोच सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. या सेवेअंतर्गत 91 हजार 568 प्रमाणपत्र नागरिकांना घरपोच उपलब्ध झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

जिल्हा सेतूकेंद्र तसेच तालुका सेतूकेंद्र दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज स्वीकारण्यासाठी नागरिकांच्या सोयी करिता ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येतात. हे अर्ज महाऑनलाईन यांनी विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणाली अर्ज स्कॅन करुन जमा करण्यास बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत असतो. नेट कनेक्टीव्हीटीची अडचण तसेच सर्व्हेरचा प्रॉब्लेम झाल्यास अर्जदाराला अर्ज सादर करणे बराच वेळ लागत असतो. त्यामुळे अर्जदारांकडून वादविवाद होत असल्यामुळे ऑफलाईन करण्याची सुविधा जिल्हा सेतूकेंद्रामध्ये करण्यात आली आहे.

ऑनलाईन प्रमाणपत्राकरिता स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये उपविभागीय अधिकारी, पाच नायब तहसिलदार व तीन कनिष्ठ लिपीक यांची नियुक्ती असून उपविभागीय अधिकारी नागपूर शहर यांच्या डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहे. तसेच ऑफलाईन व्यवस्थेकरिता दिवसनिहाय उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement

सेतूकेंद्रामध्ये अर्जदारास स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा लागतो, शपथपत्र व प्रमाणपत्राकरिता फोटो काढावा लागतो व प्रमाणपत्र तयार झाल्यावर ते भारतीय पोस्ट सेवेद्वारे घरपोच उपलब्ध करुन देण्यात येत असते. त्यामुळे दलालाचा प्रश्नच येत नाही. सेतूकेंद्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, तसेच दलालांवर प्रतिबंद करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे दलालांवर प्रतिबंदात्मक कार्यवाही करण्यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे.

सेतूकेंद्रामध्ये अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसाच्या आत प्रमाणपत्र घरपोच देण्याची सुविधा असून 11 मे पर्यंत 91 हजार 568 प्रमाणपत्र घरपोच देण्यात आली आहे. शपथपत्र व उत्पन्नाचे प्रमाणपत्र नागरिकांनी अर्ज सादर करता अर्ध्या तासामध्ये जिल्हा सेतूकेंद्रातून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. एप्रिल अखेरपर्यंत शपथपत्र व उत्पन्नाचे प्रमाणपत्र असे एकूण 97 हजार 381 नागरिकांना तात्काळ निर्गमित करण्यात आले आहे. लोकसेवा हक्क कायदामध्ये नेमुन दिलेल्या कालाविधीपेक्षाही कमी कालावधीत नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा
माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सेतूकेंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे नागरिकांना सहज व सुलभपणे प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे यादृष्टीने प्रशासनातर्फे पूर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

दहावी व बारावीच्या निकालानंतर सेतूकेंद्रात अतिरिक्त खिडक्या असून नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना सेतूकेंद्राच्या सेवे कार्यक्षमपणे व परिणामकारकपणे, गतिमान व पारदर्शकरित्या विहित केलेल्या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement