Published On : Mon, Jul 5th, 2021

८२ हजार ८२७ व्यक्तींनी केले डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन

मनपाच्या माध्यमातून हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम

चंद्रपूर, : हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता महानगरपालिका क्षेत्रात १ जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे. मागील ४ दिवसात ८२ हजार ८२७ व्यक्तींनी डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन केले.

Advertisement

हत्तीरोगाच्या प्रतिबंधाकरिता यावर्षी देखील हत्तीरोग विरोधी तीन प्रकारची औषधे नागरिकांना देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये गरोदर माता, दोन वर्षाखालील बालके, अतिगंभीर रूग्ण वगळता सर्वांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष देखरेखीत औषध खाऊ घालण्यात येत आहे. या मोहिमेत मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी सात आरोग्य झोन केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना औषध खाण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना हत्तीरोग दुरीकरणासाठी डी.ई.सी. अलबेंडाझोल, आणि आयव्हर्मेक्टिन या गोळ्या दिल्या. त्यांनी गोळ्यांचे सेवन करून मोहिमेचा शुभारंभ केला.

मनपा क्षेत्रात मागील ४ दिवसांत ९९ हजार ७०२ व्यक्तींना भेटी घेण्यात आल्या. यात ९३ हजार २०० व्यक्ती औषध खाण्यास पात्र ठरले. यातील ८२ हजार ८२७ व्यक्तींनी गोळ्यांचे सेवन केले.

सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता आरोग्य विभागामार्फत वाटप करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे, व आरोग्य विभागाला हत्तीरोग निर्मूलनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे .

औषधोपचार मोहिम
तारीख————व्यक्तीच्या भेटी—–पात्र व्यक्ती ———– गोळ्याचे सेवन केले
————————————————————————————-
ता. १ जुलै ——–२७१९६————-२५५३९ ———– २२३८२
ता. २ जुलै ——–२३२७४————-२१६४४ ———– १९०९०
ता. ३ जुलै ——–२४५५४————-२२९४४ ———– २०१०९
ता. ४ जुलै——– २४६७८————-२३०७३ ———– २१२४६
————————————————————————————-
एकूण ——– ९९ हजार ७०२ ——–९३ हजार २०० ——–८२ हजार ८२७

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement